Nihita Biswas : तुरूंगात बिकिनी किलरच्या प्रेमात, कोण आहे शोभराजची पत्नी?

मुंबई तक

‘बिकिनी किलर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चार्ल्स शोभराजच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. 21 वर्षांनंतर चार्ल्स प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण म्हणजे त्याची नेपाळमधील तुरुंगातून सुटका. 2003 पासून नेपाळच्या तुरुंगात बंद असलेल्या चार्ल्स शोभराजची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. चार्ल्स हा केवळ कुप्रसिद्ध किलरच नव्हता तर तो त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध होता. चार्ल्स शोभराजने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

‘बिकिनी किलर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चार्ल्स शोभराजच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. 21 वर्षांनंतर चार्ल्स प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण म्हणजे त्याची नेपाळमधील तुरुंगातून सुटका. 2003 पासून नेपाळच्या तुरुंगात बंद असलेल्या चार्ल्स शोभराजची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. चार्ल्स हा केवळ कुप्रसिद्ध किलरच नव्हता तर तो त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध होता. चार्ल्स शोभराजने निहिता बिस्वास या त्याच्यापेक्षा लहान मुलीशी लग्न केले, जिला तुम्ही सर्वांनी बिग बॉस 5 मध्ये पाहिले असेल.

चार्ल्सची पत्नी निहिता कोण आहे?

निहिता बिस्वास ही नेपाळची रहिवासी आहे. चार्ल्स शोभराजची नेपाळमध्येच निहिताशी भेट झाली. त्याला तुरुंगात एका अनुवादकाची गरज होती. यामुळे दोघांची भेट झाली. त्यानंतर निहिताने पत्रकारांना सांगितले की चार्ल्स शोभराज निर्दोष आहेत. त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. तुरुंगात भेटत असताना निहिता चार्ल्स शोभराजच्या प्रेमात पडली आणि नंतर दोघांनी लग्न केल्याचे सांगितले जाते.

बिग बॉसमध्ये दिसली होती

निहिता बिस्वास फक्त 21 वर्षांची होती आणि चार्ल्स शोभराज तिच्या वयाच्या दुप्पट होता. निहिता बिस्वास सीरियल किलरशी लग्न करून प्रसिद्ध झाली. दोघांच्या वयातील अंतरावरही आश्चर्य व्यक्त केले जात होते. यानंतर निहिताने बिग बॉस 5 मध्ये भाग घेतला. शोमधून बाहेर पडणारी निहिता पहिली स्पर्धक बनली होती. बिग बॉसच्या घरात निहिता बिस्वासची श्रद्धा शर्मासोबत जोरदार भांडण झाले होते. या भांडणामुळे दोघांनी चांगलीच चर्चा रंगली होती. निहिता बिस्वासचीही स्पर्धक मनदीप बेलवीशी चांगलीच लढाई झाली होती. मनदीप बेलवी यांनी निहिताला विचारले होते की, तिने चार्ल्स शोभराजसोबत कधी सेक्स केला आहे का? यावरून मोठा गदारोळ झाला.

आता कुठं आहे निहिता?

निहिता बिस्वासने एका मुलाखतीत सांगितले की ती बिग बॉसचा भाग बनली कारण चार्ल्स शोभराजला ते हवे होते. निहिताच्या मते, चार्ल्स शोभराजने तिला खूप सपोर्ट केलं. आजच्या घडीला निहिता बिस्वास कुठे आहे आणि काय करते याबद्दल कोणतीही माहिती नाही. ती सोशल मीडियावरही सक्रिय नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp