Crime : ड्रग्ज तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर महिलांनी फेकलं मिरची पूड टाकलेलं पाणी

मुंबई तक

Sanjay Nagar News: शहर पोलिसांच्या एनडीपीएस (अंमली पदार्थ) पथकाला संजयनगर लेन क्रमांक 8 मध्ये ड्रग्ज विकले जात असल्याची माहिती मिळाली होती. यावर, विशेष पोलिस पथक आणि जिन्सी पोलिस ठाण्याने घटनास्थळी छापा टाकला. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांवर महिलांचा हल्ला

point

मिरची पूड टाकलेलं पाणी पोलिसांच्या अंगावर फेकलं

point

मुख्य आरोपीला पळून जाण्यासाठी महिलांची मदत

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील संजयनगर परिसरात गुन्हेगारांना वाचवण्यासाठी  एक भलताच प्रकार पाहायला मिळाला. ड्रग्ज विक्री थांबवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकांवरच महिलांनी हल्ला केल्याची संतापजनक घटना इथे घडली. आरोपींना वाचवण्यासाठी महिलांनी छतावरून पोलिसांवर मिरचीचं पाणी फेकले आणि प्रचंड गोंधळ उडाला.

हे ही वाचा >>"आम्ही सगळ्यांचा सुपडा साफ करून दाखवला आणि...", बदलापूरमध्ये CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

शहर पोलिसांच्या एनडीपीएस (अंमली पदार्थ) पथकाला संजयनगर लेन क्रमांक 8 मध्ये ड्रग्ज विकले जात असल्याची माहिती मिळाली होती. यावर, विशेष पोलिस पथक आणि जिन्सी पोलिस ठाण्याने घटनास्थळी छापा टाकला. 

पोलीस तिथे पोहोचताच काही महिलांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि पोलिसांची कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला (woman spilled chilli powder on police). महिलांनी छतावरून मिरचीचे पाणी फेकले, ज्यामुळे पोलिसांना काहीवेळ चांगलाच त्रास झाला. पण तरीही पोलिसांनी 210 अंमली पदार्थांच्या गोळ्या आणि गांजा जप्त केला.

हे ही वाचा >>Suresh Dhas : "संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धस यांचं खळबळजनक विधान! म्हणाले, "तिच्यासोबत झटापट केल्याचं..."

दरम्यान, गोंधळाचा फायदा घेत मुख्य आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत, पण आरोपीचा शोध सुरू आहे. मुख्य आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp