Thane : 15 वर्षांपासून होतं रिलेशन, तरूणाने लग्न करण्यास नकार दिला, लग्न केल्यानंतरही ठेवत होता संबंध, तरूणीने शेवटी...
पाच वर्षांपूर्वी, त्या तरुणानं त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या महिलेशी लग्न केलं, पण असं असूनही, तो पीडितेशी संबंध ठेवत राहिला आणि वारंवार तिला लग्नासाठी फसवत राहिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

15 वर्षांचं रिलेशन, तरीही लग्नाला नकार...

कुटुंबाच्या दबावानंतर तरूणाने केलं होतं दुसरं लग्न

तरूणीशी लग्नानंतरही ठेवले संबंध
Thane Crime : ठाणे जिल्ह्यात एका तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तिसह दोन भावंडांना अटक केली आहे. प्रियकराकडून वारंवार होणाऱ्या आश्वासनांच्या उल्लंघनाला आणि मानसिक छळाला कंटाळून 35 वर्षीय अविवाहितेनं आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांसमोर हे प्रकरण आलं असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
15 वर्षांचं रिलेशन, तरीही लग्नाला नकार...
कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश कदम यांनी सांगितलं की, पीडित मुलगी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा शहरातील म्हारळ परिसरातील रहिवासी होती. तिचे गेल्या 15 वर्षांपासून उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. आरोपी तरुण अनेकदा पीडितेच्या घरी येत असे आणि तिला लग्नाचे आश्वासन देत असे. तसंच, प्रत्येक वेळी तो काहीतरी कारणं सांगून लग्नापासून मागे हटत होता. यामुळे दोघांमध्ये दररोज वाद होत होते.
हे ही वाचा >> Crime : सगळेच बहिणीवर प्रेम करतात म्हणून, 13 वर्षाच्या मुलाने 'रमन राघव' चित्रपट पाहून बहिणीला संपवलं
कुटुंबाचा दबाव आणि दुसरे लग्न
आरोपी तरुणाचा भाऊ आणि बहिण पीडितेला वारंवार आपल्या भावासोबतचं नातं तोडायला सांगत होते. कारण त्यांना दुसऱ्या मुलीशी लग्न लावायचं होतं. पाच वर्षांपूर्वी, त्या तरुणानं त्याच्या कुटुंबाच्या संमतीने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं, पण असं असूनही, तो पीडितेशी संबंध ठेवत राहिला आणि वारंवार तिला लग्नासाठी फसवत राहिला.
शेवटचं भांडण आणि थेट आत्महत्या
28 फेब्रुवारी रोजी पीडिता आणि आरोपीमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. या भांडणानंतर पीडितेनं तिच्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या करण्यापूर्वी तिने तिच्या मोबाईल फोनवर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला ज्यामध्ये तिने आरोपी आणि त्याच्या भावंडांमुळे हा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis: "विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार घातला, पण त्यांना संधी...", CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
पोलीस कारवाई आणि अटक
पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे, पोलिसांनी 2 मार्च रोजी आरोपी तरुण, त्याचा भाऊ आणि बहिणीला अटक केली. तिघांचंही वय 30 ते 35 वर्षांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातंय. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.