Sharad Pawar: अजितदादांनी पवारांची साथ सोडली, पण ‘या’ दोन तरुणांनी थोपटले दंड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या फूट पडली आहे. मात्र, अशा कठीण काळात रोहित पवार आणि आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे शरद पवारांच्या सोबत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
Rohit Pawar And Rohit Patil With Sharad Pawar: पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) पुण्यातील गुप्त भेटीनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादीत नेमकी फूट पडली आहे की नाही? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. भाजपसोबत कदापिही जाणार नाही असं शरद पवारांनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर शरद पवारांसोबतची भेट ही कौटुंबिक भेट होती असं देखील अजित पवारांनी सांगितलं आहे. तिकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देखील पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात येत आहे. (ajit pawar left sharad pawars side in such difficult times rohit pawar and rr patil son rohit Patil is seen to be with sharad pawar)
ADVERTISEMENT
हा सगळा संभ्रम असताना शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. 17 ऑगस्टला शरद पवारांची बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवारांनी येवल्यात पहिली सभा घेतली होती. आता दुसरी सभा पवार बीडमध्ये घेत आहेत. पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम असताना बीडमधल्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
दोन रोहित शरद पवारांसाठी उतरले मैदानात…
अशातच आता अजित पवार जरी पवारांची साथ सोडून गेले असले तरी दोन रोहित हे शरद पवारांसाठी मैदानात उतरले आहेत. आमदार रोहित पवार आणि आर. आर. पाटलांचे पुत्र रोहित पाटील सज्ज झाले आहेत. नुकताच रोहित पवार आणि रोहित पाटील यांनी मराठवाड्याचा दौरा करत संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे आमदार खासदार, कार्यकर्ते अजित पवारांसोबत गेलेले असताना हे दोन रोहित शरद पवारांसोबत खंबीर उभे राहिले आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> PM मोदींची मोठी घोषणा! तुम्हालाही पैसे कमवण्याची संधी? समजून घ्या प्रक्रिया
पवार बीडमध्ये सभा घेणार आहेत. या सभेची तयारी दोन्ही रोहित यांच्याकडून करण्यात आली आहे. पवारांचा विचार घेऊन आलो आहोत असं रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. त्याचबरोबर बीडची सभा ही दिशादर्शक असेल असं देखील रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
पावसाळी अधिवेशनात एमआयडीसीचा तसेच एमपीएससीच्या परीक्षांचा मुद्दा मांडून रोहित पवारांनी तरुणांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर रोहित पाटलांच्या मागे देखील मोठा तरुण वर्ग आहे. आता येत्या काळाच पवारांचा विचार तरुणांपर्यंत पोहचवण्यासाठी हे दोन्ही रोहित महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्यामुळे येत्या काळात हे दोन्ही रोहित काय करिष्मा करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT