अजितदादांच्या मुलाला क्लिन बोल्ड करणारी ऋतुजा पाटील आहे तरी कोण?, जय पवारांची कशी पडली विकेट?

मुंबई तक

Who Is Rutuja Patil :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र जय पवार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नसोहळ्यात दोन्ही पवार कुटुंब एकत्रित येणार दिसणार आहे.

ADVERTISEMENT

कोण आहे ऋतुजा पाटील? (फोटो सौजन्य: Facebook)
कोण आहे ऋतुजा पाटील? (फोटो सौजन्य: Facebook)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांची घेतली भेट

point

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर दिली माहिती

point

कोण आहेत ऋतुजा पाटील? 

Who Is Rutuja Patil: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र जय पवार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कालच (10 एप्रिल) त्यांचा साखरपुडा देखील पार पडला. पण याच दरम्यान, सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. जय पवार यांचं लग्न ऋतुजा पाटील यांच्याशी होणार असून या दोघांनीही शरद पवारांची नुकतीच भेट घेतली होती. जय पवार यांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जय आणि ऋतुजाचे फोटो पोस्ट केले होते. परंतु, या दोघांच्या लग्नाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच अनेकांना एक प्रश्न पडलाय. तो म्हणजे, जय पवार यांची होणारी पत्नी ऋतुजा पाटील आहे तरी कोण? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. 

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांची घेतली भेट

साखरपुड्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांची नुकतीच भेट घेतली. त्यांच्या मोदीबाग निवासस्थानी या दोघांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. तसच जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवार यांना त्यांच्या साखरपुड्याच्या पार्टीत सहभागी होण्याचं आमंत्रणही दिलं.

इतकच नव्हे तर जय आणि ऋतुजाने शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याशीही गप्पा मारल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लग्नाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांचे कुटुंबिय एकत्रित आल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही पवार कुटुंबाची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार आहे. 

हे ही वाचा >> शाळेतल्या 13 वर्षाच्या मुलींना जवळ बोलावलं, सोलापुरात 68 वर्षाच्या वृद्धाने लाज सोडून... पोक्सो अंतर्गत गुन्हा

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर दिली माहिती

खासदार सुपिया सुळे पवार कुटुंबातील या सोनेरी क्षणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या पोस्टच्या माध्यमातून सुळेंनी म्हटलंय की, ऋतुजा पाटील आता पवार कुटुंबियांची सून होणार आहे. सुप्रिया सुळेंनी जय आणि ऋतुजाने शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीचेही फोटो शेअर केले आहेत. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दोन मुलं आहेत. पार्थ पवार आणि जय पवार. आता जय पवारच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने कुटुंबात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. 

हे ही वाचा >> Thane: अचानक आला अन् 'त्या' मुलीला भररस्त्याच... इंजिनिअरिंगला असलेल्या तरुणाने केलं नको ते!

कोण आहेत ऋतुजा पाटील? 

जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील साताऱ्यात राहणाऱ्या प्रविण पाटील यांची मुलगी आहे. जय पाटील आणि ऋतुजा पाटील मागील काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ऋतुजा पाटील उच्चशिक्षित आहेत. त्यांनी अमेरिकेतून डिझायनिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे शिक्षण त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनाला पूरक ठरले आहे.

सध्या ऋतुजा मुंबईतील एका पीआर (पब्लिक रिलेशन्स) कंपनीत कार्यरत आहेत. काही माहितीनुसार, त्या स्वतःही सोशल मीडिया क्षेत्रात सक्रिय असून, त्यांच्या वडिलांच्या व्यवसायाशी संबंधित कामात सहभागी असण्याची शक्यता आहे.

त्यांचा स्वभाव सौम्य आणि संवादकौशल्य उत्कृष्ट असल्याचे सांगितले जाते, जे त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात त्यांना लाभदायक ठरते.

ऋतुजा पाटील या साताऱ्याच्या फलटण येथील रहिवासी असलेल्या प्रवीण पाटील आणि पल्लवी पाटील यांच्या कन्या आहेत. प्रवीण पाटील हे एक यशस्वी उद्योजक असून, सोशल मीडिया आणि डिजिटल क्षेत्राशी संबंधित व्यवसाय सांभाळतात. त्यांनी टाटा, आदित्य बिर्ला, रिलायन्स, आणि हिरो यांसारख्या नामांकित कंपन्यांसह तसेच भारत सरकारसोबत महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

ऋतुजा यांची बहीण ही केसरी ट्रॅव्हल्सच्या पाटील कुटुंबातील सून आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाची व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठा अधोरेखित होते. तसेच, त्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे दिवंगत चेअरमन हनुमंतराव पवार यांच्या नातसंबंधित आहेत.

जय पवारांशी कशी झालेली ओळख?

  • ऋतुजा आणि जय पवार यांची ओळख गेल्या काही वर्षांपासून होती. एका खासगी कार्यक्रमात जय आणि ऋतुजा यांची भेट झाली होती. पुढे या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

  • त्यांचा साखरपुडा पुण्यातील अजित पवार यांच्या फार्महाऊसवर पार पडला. या सोहळ्याला पवार कुटुंबातील शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, प्रतिभा पवार यांच्यासह मोजके नातेवाईक आणि पक्षातील नेते उपस्थित होते.

  • साखरपुड्यापूर्वी, 13 मार्च 2025 रोजी ऋतुजा आणि जय यांनी शरद पवार यांची पुण्यातील मोदीबागेतील निवासस्थानी भेट घेऊन साखरपुड्याचे आमंत्रण देत आशीर्वाद घेतले होते.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp