Ayodhya Ram Mandir Live: ‘शिवाजी राजांना संन्यास घ्यायचा होता..’, PM मोदींसमोर ‘त्या’ महाराजांचं वक्तव्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

ayodhya ram mandir live shivaji maharaj wanted to abdicate govindgiri maharaj statement infront of pm modi
ayodhya ram mandir live shivaji maharaj wanted to abdicate govindgiri maharaj statement infront of pm modi
social share
google news

Ayodhya Ram Mandir Inauguration Updates: अयोध्या: अयोध्योत राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात करण्यात आली. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते हा संपूर्ण सोहळा पार पडला. पण याचवेळी गोविंदगिरी महाराज यांनी एका असं विधान केलं की, ज्यामुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना संन्यास घ्यायचा होता. असं विधान त्यांनी अयोध्येतील राममंदिर सोहळ्यानंतर केलेल्या भाषणात केलं आहे. (ayodhya ram mandir live shivaji maharaj wanted to abdicate govindgiri maharaj statement infront of pm Modi)

ADVERTISEMENT

‘छत्रपती शिवाजी महाराजांना संन्यास घ्यायचा होता..’ नेमकं काय म्हणाले गोविंदगिरी महाराज?

‘लोकांना माहिती नाही की, जेव्हा शिवाजी महाराज हे मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेले होते तेव्हा त्यांनी तीन दिवस उपवास केला आणि तीन दिवस शिव मंदिरात राहिले. महाराजांनी तेव्हा असं म्हटलं की, मला राज्य करायचं नाही.. मला संन्यास घ्यायचा आहे. मी शिवाच्या आरधनेसाठी जन्म घेतलाय. मला संन्यास घ्यायचा आहे. मला परत घेऊन जाऊ नका.’

हे ही वाचा>> Ram Mandir Pran Pratishtha: आमंत्रण मिळूनही अडवाणी का गेले नाही अयोध्याला, कारण…

‘इतिहासातील तो विलक्षण प्रसंग आहे. त्यावेळी त्यांच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजवलं की, आणि त्यांना परत आणलं. त्यांना सांगितलं की, तुमचं हे कार्य देखील भगवत सेवाच आहे.’ असं गोविंदगिरी महाराज यांनी विधान केलं आहे.

हे वाचलं का?

पाहा गोविंदगिरी महाराजांनी त्यांच्या भाषणात नेमकं काय-काय म्हटलं…

एका स्तरावर आपल्याला महापुरुष उपलब्ध होतो आणि त्या विभूतीमुळे युग परिवर्तन होतं. अशा प्रकारचं परिवर्तन आणण्यासाठी तशी साधना करावी लागते. तशा प्रकारे जीवन साधणारे आपल्या देशाच्या परंपरेतील अनेक महान रत्नांमधील एक असे सन्माननीय पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत.

हे केवळ या देशाचं नाही तर संपूर्ण विश्वाचं सौभाग्य आहे की, आपल्या एक राजदर्शी आपल्याला प्राप्त झालाय. तुमच्या मंगल हातांनी आज प्रतिष्ठा झाली. स्वाभाविक देखील होतं.. ते व्हायचंच होतं. पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की, जेव्हा मला 20 दिवसआधी समजलं की, पंतप्रधानांना स्वत: कोणकोणते अनुष्ठान करुन स्वत:ला कसं सिद्ध करावं लागणार.. त्याची नियमावली तुम्ही लिहून पाठवा.

भगवान श्रीरामाची प्रतिष्ठा करायची होती. त्यामुळे एका महान विभूतीला असं वाटलं की, मी स्वत:ला देखील त्यासाठी सिद्ध करू.

तपानेच विशेष परिशुद्धी होते. मी म्हटलं होतं की, आम्ही.. महापुरुषांकडून परामर्श घेऊन पंतप्रधानांना सांगितलं होतं की, आपल्याला केवळ 3 दिवसाचा उपवास करावा लागेल. पण आपण 11 दिवसांचं संपूर्ण उपोषण केलं. आम्ही 11 दिवस एकभुक्त राहायला सांगितलं होतं. पण त्यांनी अन्नाचाच त्याग केला.

असा तपस्वी कोणी राष्ट्रीय नेता म्हणून प्राप्त होणं ही काही सामान्य गोष्ट नाही. भारतमातेच्या प्रत्येक कानाकोपाऱ्यात जाऊन पंतप्रधान आवाहन करत होते की, या दिव्य आत्मांनो या.. अयोध्येत या.. आणि आमच्या राष्ट्राला महान बनविण्यासाठी आशीर्वाद द्या.

आम्ही सांगितलं होतं की, तुम्हाला केवळ 3 दिवस भूमीशयन करावं लागेल पण तुम्ही 11 दिवसांपासून भूमीशयन करत आहात.

जेव्हा ब्रम्हदेवांनी सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी एक शब्द ऐकला होता. तो म्हणजे तप.. पण आज तप कमी झालं आहे.. पण ते तप आपण साकार करत आहात. ही परंपरा पाहता मला फक्त एक राजा लक्षात येतो.. ज्याच्यामध्ये हे सगळं होतं. तो राजा म्हणजे.. छत्रपती शिवाजी महाराज!

लोकांना माहिती नाही की, ते स्वत: जेव्हा मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेले होते तेव्हा त्यांनी तीन दिवस उपवास केला आणि तीन दिवस शिव मंदिरात राहिले. महाराजांनी तेव्हा असं म्हटलं की, मला राज्य करायचं नाही.. मला संन्यास घ्यायचा आहे. मी शिवाच्या आरधनेसाठी जन्म घेतलाय. मला संन्यास घ्यायचा आहे. मला परत घेऊन जाऊ नका.

इतिहासातील तो विलक्षण प्रसंग आहे. त्यावेळी त्यांच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजवलं की, आणि त्यांना परत आणलं. त्यांना सांगितलं की, तुमचं हे कार्य देखील भगवत सेवाच आहे.

हे ही वाचा>> Ram Mandir : ‘अयोध्येत आता गोळीबार… कर्फ्यूही लागणार नाही’, असं का म्हणाले योगी आदित्यनाथ?

असं विधान गोविंदगिरी महाराजांनी केलं आहे. ज्यावरून आता सोशल मीडियावर काही यूजर्सकडून सवाल देखील उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता त्यांच्या या विधानाने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT