Balmukund Acharya : महंत बालमुकुंद हरता हरता जिंकले, काय झालं 19व्या फेरीत

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Balmukund has defeated Congress's RR Tiwari from Hawamahal seat.
Balmukund has defeated Congress's RR Tiwari from Hawamahal seat.
social share
google news

Balmukund Acharya News : जयपूरच्या हवामहल मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर बालमुकुंद आचार्य सतत अॅक्शन मोडमध्ये आहेत. कधी ते मांसाहारी दुकाने बंद करण्यासाठी आपल्या समर्थकांसह येतात, तर कधी मुस्लिम समाजासोबत उभे राहून स्पष्टीकरण देताना दिसत आहेत. (balmukund acharya election results 2023 News)

ADVERTISEMENT

या कृतीमुळे बालमुकुंद यांच्यावर सोशल मीडियावर टीका आणि कौतुक दोन्हीही होत आहे. बालमुकुंद यांनी हवामहल मतदारसंघातून काँग्रेसचे आरआर तिवारी यांचा पराभव केला आहे. पण विशेष म्हणजे ते केवळ 974 मतांनी विजयी झाले. या जागेवर NOTA (1463) ला यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत.

राजस्थानमध्ये अशा एकूण 13 जागा आहेत, जिथे NOTA ने उमेदवारांचे गणित बिघडवले आहे. या जागांवर उमेदवार पराभूत झालेल्या मतांपेक्षा NOTA मध्ये जास्त मते पडली. असाच एक मतदारसंघ म्हणजे हवामहल.

हेही वाचा >> Assembly Election 2023 : बालमुकुंद ते ओतराम… भाजपच्या चार महंतांचं काय झालं?

हवामहल विधानसभा मतदारसंघातून बालमुकुंद आचार्य यांना 95989 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार तिवारी यांना 95015 मते मिळाली आहेत. याच मतदारसंघात NOTA ला तब्बल 1463 मते पडली. 19 पैकी 18 व्या फेरीपर्यंत बाबा बालमुकुंद हे पिछाडीवर होते, तर काँग्रेस उमेदवार आघाडीवर होता. त्यांच्या समर्थकांनीही आशा सोडली होती, मात्र अखेरच्या फेरीनंतर ते 974 मतांनी विजयी झाले. बालमुकुंद आचार्य हे अखिल भारतीय संत समाज राजस्थानचे प्रमुख आहेत.

NOTA ने 13 जागांचे बिघडवले गणित

विजय आणि पराभवात ‘नोटा’ ठरले गेम चेंजर

मतदारसंघ >> नोटा >> विजय-पराभूत उमेदवारांतील मतांचे अंतर
नसीराबाद >> 1392 >> 1135
काठुमार >>738 >> 409
बांसवाडा >> 3528 >> 1400
बायतू >> 2173 >> 910
चौहान >> 3901 >> 1428
असिंद >> 2029 >> 1526
जहाजपूर >> 2542 >> 580
कोटपुतली >> 1344 >> 321
हवामहाल >> 1463 >> 974
भीनमाळ >> 4084 >> 1027
जयल >> 2200 >> 1565
खिंसार >> 2130 >> 2059
मावळी >> 2411 >> 1567

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Rajasthan Elections 2023 : गेहलोतांच्या भूमीत मोदींची ‘जादू’, भाजपने कसा बदलला ‘गेम’?

राजस्थानमध्ये भाजपचा विजय

राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राजस्थानमध्ये भाजपने 115 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने 69 आणि इतरांनी 15 जागा जिंकल्या आहेत. राजस्थानच्या जनतेने दर 5 वर्षांनी सरकार बदलण्याची 30 वर्षांची जुनी परंपरा कायम ठेवली आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT