Portfolio Allocation: अखेर... खाते वाटप जाहीर! शिंदे-अजितदादांना भाजपने काय दिलं?, पाहा संपूर्ण यादी

अभिजीत करंडे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फडणवीस सरकारचं खाते वाटप अखेर झालं जाहीर

point

सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी खाते वाटप जाहीर

point

पाहा खाते वाटपाची संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Portfolio allocation: नागपूर: महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचं खाते वाटप हे अखेर जाहीर झालं आहे. 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता. तर 15 डिसेंबर रोजी 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होतील. मात्र, त्यानंतरही खाते वाटप हे जाहीर करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे सबंध हिवाळी अधिवेशनात कोणत्याही पदभार नसलेले मंत्री हे विधीमंडळात हजर होते. अखेर आज (21 डिसेंबर) मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे.  (finally portfolio allocation announced cm devendra fadnavis gave which ministry to whom see the complete list)

ADVERTISEMENT

राज्यात नवं सरकार अस्तित्वात येऊन 15 दिवसांहून अधिकचा काळ लोटला तरी खाते वाटप जाहीर होत नसल्याने सरकारवर सातत्याने टीका करण्यात येत होती. मात्र, आता खाते वाटप झालं आहे. यामध्ये कोणत्या मंत्र्यांना नेमकी कोणती खाती मिळाली यावर आपण एक नजर टाकूया. 

हे ही वाचा>>  Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी अचानक घेतली CM फडणवीसांची भेट... शिंदेंना शह?

शिवसेनेने सुरुवातीपासून गृह खात्याचा आग्रह धरला होता. पण त्यांना हे खातं मिळालेलं नाही. भाजपने ते आपल्याकडेच ठेवलं आहे. पण या बदल्यात शिवसेनेला नगरविकास, गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती मिळाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ, कृषी ही महत्त्वाची खाती मिळाली आहेत. 

पाहा कोणत्या पक्षाच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळाली...

भाजपचे मंत्री

देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री, गृह, ऊर्जा (वगळून अक्षय ऊर्जा), कायदा आणि न्यायव्यवस्था, सामान्य प्रशासन विभाग, माहिती आणि प्रसिद्धी (आणि इतर कोणत्याही मंत्र्याला वाटप न केलेले विभाग/विषय)

  • चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
  • राधाकृष्ण विखे-पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
  • चंद्रकांत पाटील - उच्च आणि तंत्र शिक्षण, संसदीय कामकाज
  • गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन
  • गणेश नाईक - वन खातं 
  • मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम
  • जयकुमार रावल - पणन आणि राजशिष्टाचार
  • पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन
  • अतुल सावे - ओबीसी कल्याण, दुग्धविकास आणि अक्षय ऊर्जा
  • अशोक उईके - आदिवासी विकास
  • आशिष शेलार - माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक
  • शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
  • जयकुमार गोरे - ग्रामविकास आणि पंचायती राज
  • संजय सावकारे - वस्त्रोद्योग
  • नितेश राणे - मत्स्यव्यवसाय, बंदरे
  • आकाश फुंडकर - कामगार
  • माधुरी मिसाळ (राज्यमंत्री) - नगरविकास, वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ
  • पंकज भोयर (राज्यमंत्री) - गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खाणकाम
  • मेघना बोर्डिकर (राज्यमंत्री) - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

हे ही वाचा>>  Ajit Pawar: अजितदादा अस्वस्थ... अधिवेशन सोडून तडकाफडकी गेले दिल्लीला, घडलं तरी काय?

शिवसेनेचे मंत्री

एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

  • गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा आणि स्वच्छता
  • दादा भुसे - शालेय शिक्षण
  • संजय राठोड - मृद व जलसंधारण
  • उदय सामंत - उद्योग, मराठी भाषा
  • शंभूराज देसाई - पर्यटन, खाणकाम, माजी सैनिक कल्याण
  • संजय शिरसाट - सामाजिक न्याय
  • प्रताप सरनाईक - परिवहन
  • भरतशेठ गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन, खार जमीन विकास
  • प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
  • आशिष जैस्वाल (राज्यमंत्री) - अर्थ आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, कायदा आणि न्यायव्यवस्था, कामगार
  • योगेश कदम (राज्यमंत्री) - गृह (शहर), महसूल, ग्रामीण विकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री

अजित पवार - उपमुख्यमंत्री, अर्थ आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

 

  • हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
  • धनंजय मुंडे - अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
  • दत्तात्रय भरणे - क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ
  • आदिती तटकरे - महिला आणि बालकल्याण विकास
  • माणिकराव कोकाटे - कृषी
  • नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य
  • मकरंद जाधव-पाटील - मदत आणि पुनर्वसन
  • बाबासाहेब पाटील - सहकार
  • इंद्रनील नाईक (राज्यमंत्री) - उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण

 


 

 

 

 

 

    दरम्यान, मंत्रिमंडळात भाजपचे सर्वाधिक मंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांसह भाजपचे एकूण 19 मंत्री आहेत. या पाठोपाठ शिवसेनेचे 12 मंत्री आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 मंत्री मंत्रिमंडळात आहेत.

     

    हे वाचलं का?

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT