NCP Portfolio list: भाजपची अजितदादांवर मेहरनजर? दिली 'वजनदार' खाती!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपने अजितदादांना हवं असणारं महसूल खातं स्वत:कडे ठेवलं

point

अजित पवारांना अर्थ आणि उत्पादन शुल्क खातं दिलं

point

पाहा राष्ट्रवादी काँग्रेसला कोणती खाती दिली

NCP Portfolio: मुंबई: भाजपच्या मुख्यमंत्री पदाला उघडउघड आणि तात्काळ पाठिंबा देणाऱ्या अजित पवार यांच्यावर भाजप नेतृत्व बरंच खुश असल्याचं दिसतं आहे. कारण खाते वाटपामध्ये शिंदेंच्या बरोबरीनेच अत्यंत महत्त्वाची खाती ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहेत. आज (21 डिसेंबर) जाहीर झालेल्या खाते वाटपात भाजपने अजित पवार यांना बरंच झुकतं माप दिल्याचं दिसतं आहे. त्यामुळे या खाते वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला नेमकं काय मिळालं हे आपण आता पाहूया. (ncp portfolio list bjp kept the home and revenue portfolio but gave weighty ministries to ajit pawar ncp)

ADVERTISEMENT

भाजपने गृह आणि महसूल ही महत्त्वाची खाती ही स्वत:कडे घेतली आहेत. पण असं असलं तरी अर्थ, उत्पादन शुल्क, कृषी, सहकार आणि महिला व बालकल्याण ही अत्यंत महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बरोबरीचीच वजनदार खाती ही अजितदादांना मिळाली आहे. 

हे ही वाचा>> Partywise Portfolio Allocation: भाजपकडे गृह, महसूल.. महायुतीत कोणत्या पक्षाकडे कोणती खाती?

या महत्त्वाच्या खात्यांपैकी अर्थ आणि उत्पादन शुल्क ही अत्यंत महत्त्वाची खाती स्वत: अजित पवार यांनी आपल्याकडे ठेवली आहेत. याशिवाय अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना नेमकी कोणती खाती दिली आहेत हे पाहूया संक्षिप्तपणे. 

राष्ट्रवादी काँग्रेसला कोणती खाती?

अजित पवार - उपमुख्यमंत्री, अर्थ आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

  • हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
  • धनंजय मुंडे - अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
  • दत्तात्रय भरणे - क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ
  • आदिती तटकरे - महिला आणि बालकल्याण विकास
  • माणिकराव कोकाटे - कृषी
  • नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य
  • मकरंद जाधव-पाटील - मदत आणि पुनर्वसन
  • बाबासाहेब पाटील - सहकार
  • इंद्रनील नाईक (राज्यमंत्री) - उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण


राष्ट्रवादी काँग्रेस हे महसूल आणि उत्पादन शुल्क या दोनही खात्यांसाठी आग्रही होती मात्र, त्यापैकी महसूल हे भाजपने स्वत:कडे ठेवलं तर उत्पादन शुल्क हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Shiv Sena Portfolio list: भाजपने शिंदेंना गृह खातं दिलंच नाही, शिवसेनेला नेमकं काय-काय मिळालं?

दरम्यान, या मंत्रिमंडळ वाटपावर नजर टाकल्यास भाजपने काही प्रमाणात समतोल राखला आहे. तसंच अजित पवार यांना मंत्रिमंडळाच्या खाते वाटपात काही प्रमाणात झुकतं माप दिल्याचंही दिसंत आहे. अशावेळी आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेतं किंवा त्यांचे मंत्री आणि आमदार कशा प्रकारे या खातेवाटपाबाबत व्यक्त होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT