Sharad Pawar Call Devendra Fadnavis : शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, 'या' घटनेवर बोेलताना म्हणाले...
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या संवादात शरद पवार यांच्याकडून बीडच्या घटनेचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन
फडणवीसांना फोन करुन काय म्हणाले शरद पवार?
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंत काल खातेवाटप जाहीर करण्यात आलं. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी सुरू असतानाच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी आज पुण्यात असताना देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Pooja Khedkar Case मुळे सरकारी नोकर भरती प्रक्रियेत केले मोठा बदल, आधारबद्दल काय आहे नवा नियम?
शरद पवार हे आज सकाळी पुण्यातील मोदी बागेत उपस्थित होते. यावेली साहित्य संमेलनाच्या मंडळींनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार भीमथडीच्या जत्रेलाही गेले. यावेळी शरद पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन लावल्याची माहिती आहे. यावेळी झालेल्या संवादात शरद पवार यांच्याकडून बीडच्या घटनेचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे. बीडच्या मस्साजोगमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात लक्ष घालून लक्ष घालण्याची विनंती केली.मी काल भेटून आलो, त्याठिकाणी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्या घटनेची सखोल चौकशी करुन न्याय देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असं शरद पवार म्हणाले आहेत. तसंच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातील भीमथडीच्या जत्रेसाठीही आमंत्रण दिल्याची माहिती आहे.
देशमुख कुटुंबीयांना भेट दिल्यानंतर काय म्हणाले होते पवार?
हे ही वाचा >> Uddhav Thackeray Raj Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, काय होतं निमित्त? दोघांमध्ये काय चर्चा?
बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात लौकिक आहे. महाराष्ट्राचा साखर उद्योगाला हातभार लावणारा जिल्हा हा जिल्हा आहे. आज या जिल्ह्यात जे घडलं ते कोणालाही न पटणारं आहे. संतोषचा यात काहीच संबंध नसताना हे घडलं. या प्रकरणाची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी. आमच्या सहकाऱ्यांनी यात न्याय मिळावा म्हणून लोकसभेत आवाज उठवला. बीडमध्ये आज दहशतीचं वातावरण आहे, पण त्यातून बाहेर पडा. हत्या करणारे आरोपी आणि सूत्रधार यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही शरद पवार यांनी केली. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या प्रकरणाच्या खोलात जाणार नाही तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जावं, आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी शरद पवार यांच्यासमोर देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT