CM एकनाथ शिंदे सुट्टीवर! मुंबई अन् ठाणे सोडून थेट सातारा गाठलं; कारण रात्री 2 वाजता…
एकीकडे राज्यात राजकारण पेटले असताना मुख्यमंत्री अचानक सुट्टीवर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ADVERTISEMENT
सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) 3 दिवसांच्या सुट्टीवर असल्याची माहिती आहे. त्यांच्या या सुट्टीची राज्यभरात चांगलीच चर्चा सुरु आहे. शिंदे त्यांच्या मुळ गावी साताऱ्यातील दरे तांब येथे गेले आहेत. गावची यात्रा असल्याने ते तिकडे गेल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. एकीकडे राज्यात राजकारण पेटले असताना मुख्यमंत्री अचानक सुट्टीवर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एखादा मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही बोलले जात आहे. (Deepak Kesarkar told the reason why Chief Minister Eknath Shinde went on a 3-day vacation.)
ADVERTISEMENT
केसरकर काय म्हणाले?
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुट्टीविषयी बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले, सर्वात जास्त वेळ काम करणारा, सर्वांना भेटणारा आणि फक्त 4 तास झोपणारा मुख्यमंत्री आज राज्याला लाभला आहे. म्हणून त्यांच्या अवतीभवती सतत गर्दी असते. त्यामुळे मुंबई किंवा ठाण्यात राहून मुख्यमंत्र्यांना विश्रांती मिळत नाही. रात्री 2 वाजता त्यांना सलाईन लावावी लागते. यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा आराम करण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार,मग पाटावर कोण बसणार? ठाकरे गटाची शिंदेंवर टीका
मुख्यमंत्री तयार नसले तरी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सक्तीच्या आणि तातडीच्या विश्रांतीसाठी साताऱ्याला त्यांच्या मूळ गावी नेले आहे. मात्र काही लोक यावरून वावड्या उठवत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या प्रकृतीवरून जर राजकारण होत असेल तर हे निषेधार्ह आहे. जनतेला माहिती आहे ते अशा अफवांना थारा देणार नाहीत, असेही केसरकर यांनी मत व्यक्त केले.
हे वाचलं का?
मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार :
दरम्यान, आज सकाळी साताऱ्यातील दरे तांब या गावी पोहचल्यापासूनच ग्रामस्थ, जिल्ह्यातील नागरिक यांनी शिंदे यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. सर्वांची भेट घेतल्यानंतर त्यांनी थेट आपल्या निवासस्थानाच्या अवतीभोवती असणाऱ्या शेतीची पाहणी केली. शेतीची पाहणी करत असताना आंबा, चिकू, नारळ आणि विविध जातीच्या फळबागांच्या झाडांची स्वतः तपासणी केली. या संदर्भातील सर्व माहिती कृषी तज्ञाकडून घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या घरातच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर जनता दरबार भरवला.
हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या सुट्टीवर? अचानक सुट्टीमागचं कारण काय?
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर विभागातून आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या. सातारा जिल्ह्यासाठी विकासात्मक धोरणाची अधिकाऱ्यांकडून माहिती घेत मंजूर झालेल्या निधीबाबतच्या विनियोगच्या सूचना दिल्या. यावेळी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख आणि विविध खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT