“मला चेकमेट करण्याचा…”, अजित पवार-शरद पवारांची भेट, शिंदेंचं सूचक विधान
मला काही लोक चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मोठे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT
Eknath shinde news : अजित पवार-शरद पवार भेटीनंतर राजकीय पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. या गुप्त भेटीनंतर पहिल्यांदाच राजकीय भाष्य करताना एकनाथ शिंदेंनी मोठं विधान केलं. मला चेकमेट करण्याचा प्रयत्न होतोय, असं शिंदे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी इतरही मुद्द्यांवरही सूचक वक्तव्ये केले.
ADVERTISEMENT
ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओत बोलताना शिंदेंनी बुद्धिबळाचा उल्लेख करत त्यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे.
एकनाथ शिंदे नेमकं काय बोलले?
एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना म्हणाले, “रोटरी क्लब ऑफ ठाणे आणि अपस्टेप अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विश्वनाथन आनंद यांनी एकाच वेळी 22 बुद्धिबळपटूंचा मुकाबला केला. खरंतर त्यांनी राजकारणात यायला पाहिजे होतं. कारण आम्हालाही एकाच वेळी कितीतरी विरोधकांशी मुकाबला करावा लागतो. त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात. त्यात काही अडीच घरे चालणारे घोडे असतात. काही हत्ती असतात. सगळेच एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाचा >> ‘…याचे नाटक निदान यापुढे तरी करू नका’, शिवसेना (UBT) शिंदेंवर का भडकली?
यावर पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “गेल्या एक वर्षापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न अनेकजण करताहेत. पण त्यांचं स्वप्न काही साकार होत नाहीये. विरोधकांनी आपली बुद्धी कितीही पणाला लावली, तरी जनतेचं विश्वासाचं आणि पाठिंब्याचे बळ माझ्याकडे आहे. त्यामुळे विरोधकच सतत चीतपट होताहेत. आजकाल राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा तर आमच्यासारख्या नेत्यांना बुद्धिबळ खेळण्याची फार गरज आहे.”
“आम्ही राजकारणातील ग्रॅण्ड मास्टर, पण…”
“मला कल्पना आहे की, एकवेळ राजकारणातील बुद्धिबळ खेळणं सोप्प आहे; पण परंतु जगात स्वतःची मुद्रा उमटवणं खूप कठीण आहे. विश्वनाथन आनंद यांनी एकदा नव्हे, तर अनेकदा साध्य केलंय. पाच वेळा जागतिक विजेते ठरलेत. गेल्या वर्षी आम्ही जी राजकीय क्रांती केली. ती पाहून काहीजण आम्हाला राजकारणातले ग्रॅण्ड मास्टर म्हणतात, पण खरे ग्रॅण्ड मास्टर हे विश्वनाथ आनंद हेच आहेत”, असे शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT
वाचा >> “मोदींची अजित पवारांना अट! शरद पवार आले तरच मुख्यमंत्रीपद”
एकनाथ शिंदेंचं सूचक भाष्य
अजित पवार एनडीएमध्ये सामील झाल्यापासून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवणार अशी चर्चा सुरू आहे. यातच मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर शरद पवारांनाही सोबत घ्या, अशी अट टाकल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलायं. एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं, असंही म्हटलं जात आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केलेलं हे विधान महत्त्वाचं समजलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे विरोधकांकडून असा उल्लेख केलाय, त्यामुळे हे विरोधक भाजपतीलच तर नाही ना? असा प्रश्नही चर्चेत आलाय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT