शंभूराज देसाईंकडून घेतली पुडी… शिंदे बोलत असताना भरत गोगावलेंनी बघा काय केलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

शंभूराज देसाईंच्या पुडीसोबत भरत गोगावलेंनी बघा काय केलं
शंभूराज देसाईंच्या पुडीसोबत भरत गोगावलेंनी बघा काय केलं
social share
google news

Shambhuraj Desai vs Bharat Gogawale video Viral :ठाकरे गटाचे आमदार शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांचा विधानसभेतील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओत शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी खिशातून पुढी काढत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या दिशेने सरकवल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान या पुडीत नेमकं काय होत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर मुख्यमंत्री बोलत असताना हा सर्व प्रकार घडत असल्याचे पाहून विरोधकांनी या प्रकरणावर कारवाईची मागणी केली आहे.(eknath shinde speaking in vidhansabha shambhuraj desai share pudi to bharat gogawale video viral)

ADVERTISEMENT

व्हिडिओत काय?

विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बुलेट प्रकल्पाबाबत महत्वपुर्ण माहिती देत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या मागे बसलेले शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) खिशातून काही तरी वस्तु काढत होते. अनेकजण या वस्तुला पुडी म्हणत आहे. ही पुडी नंतर शंभूराज देसाई यांनी भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या दिशेने सरकावली होती. ही पुडी हातात आल्यानंत गोगावले यांनी त्यातली वस्तु हातात घेत ती मळली होती. मळून झाल्यानंतर तो पुडीतला पदार्थ तोंडात टाकला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ही पुडी शंभूराज देसाईंना परत केली होती.देसाईंनी ही पुढी इतर आमदारांना देण्यासाठी पुढे केली होती.मात्र त्यांनी ती नाकारल्याचे दिसत आहे.

Sharad Pawar: राहुल गांधींना झालेली शिक्षा हेच अधोरेखित करतेय; न्यायालयाच्या निकालानंतर पवारांनी व्यक्त केली चिंता

मला व्हिडिओ बघावा लागेल, कुठला व्हि़डिओ आहे तो? दुपारपासून मंत्रालयात होतो. खिशातला काही कागद असेल अथवा काहीतरी दिले असेल, बघतो मी त्यांना काय दिले ते.पण नियम मोडणार कुठलंही कृत्य माझ्याकडून झालं नाही, असे स्पष्टीकरण शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मीडियाला दिले होते.

मी तंबाखु नाही खात, सुपारी नाही खात, दारू नाही पित, इलायचीची (वेलची) डबी होती. वेलची मुखशुद्धीसाठी, बाकी दुसर काही नव्हत,असे भरत गोगावले म्हणाले. दुसऱ्या पुड्या बिड्या जादूच्या नसतात.दुसरा काही शौक नाही तर वेलची तर खाऊ द्या आम्हाला,असे देखील भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले.

राज ठाकरेंनी निवडून आणलेले 13 आमदार सध्या आहेत कुठे?

आदित्य ठाकरेंची कारवाईची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत बुलेट ट्रेन सारख्या महत्वपुर्ण विषयावर बोलत असताना शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांच्यात पुडीचा खेळ सूरू होता. या सर्व प्रकारावर विरोधी पक्षांनी कारवाईची मागणी केली आहे. हा निंदनीय प्रकार आहे. सभागृहात जी प्रथा, परंपरा आहे, त्याचे कुठचेही पालन होत नाहीयेत. आणि आज जे टीव्हीवर दिसले आहे, तसे जर आपले राज्यकर्ते वागत राहिले, तर हे कसले राज्यकर्ते होणार असा सवाल उपस्थित करत याच्यावर सभागृहात कारवाई होणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हर्षवर्धन जाधव नव्या पक्षात; राजकीय निवृत्तीची घोषणा विसरुन पुन्हा सक्रिय

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT