शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार? एकनाथ शिंदेंनी अयोध्येत दिलं उत्तर
शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा सातत्याने होत असते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे प्रभू रामाचे दर्शन घेणार असून, राम मंदिराच्या बांधकामाची पाहणीही करणार आहेत. दरम्यान, याच दौऱ्यात ‘आज तक’ला मुख्यमंत्री शिंदे यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का? प्रश्नावर भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे दोन्ही गट (ठाकरे आणि शिंदे गट) एकत्र येणार का? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, “दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी नाही. आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहोत, जो बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता. बाळासाहेब ठाकरेंचा विचार तोंडून जे सरकार बनवलं होतं, ते आता नाही.”
संबंधित बातमी >> पायी रॅली, महंतांचे दर्शन आणि शरयू आरती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असा आहे दौरा
“शिवसेना आणि भाजप नैसर्गिक युती आहे. आमची आणि भाजपची विचारधारा सारखी आहे. आधी लोकांना हिंदू म्हणायलाही भीती वाटत होती. 2014 मध्ये जेव्हा मोदीजींचे सरकार आले, तेव्हापासून हिंदुत्वावाचा मान सन्मान केला जात आहेत. ‘गर्व से कहो हम हिंदू है’, हा नारा देणारे बाळासाहेब ठाकरे होते”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
उद्धव ठाकरेंना शिंदेंचं चॅलेंज, सावरकरांच्या मुद्द्यावर काय म्हणाले?
यावेळी एकनाथ शिंदे यांनी सावरकरांच्या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना घेरलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “वीर सावरकरांचा अपमान हा संपूर्ण भारताचा अपमान आहे. हिंदुत्वाचा अपमान आहे. त्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांच्या किती यातना सहन केल्या.”
“शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने काँग्रेससोबत चर्चा केली, पण कथनी आणि करनीमध्ये फरक असतो. चर्चा करून काही होत नाही. शिवसेना आणि भाजप सावरकरांच्याबद्दल रोखठोक भूमिका घेत आहे. जर हिंमत असेल, तर त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधीविरुद्ध रस्त्यावर उतरावं”, असं आव्हान शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “दुर्दैवाची गोष्ट अशी की, जेव्हा काँग्रेसने आणि राहुल गांधी सावरकरांबद्दल उलटसुलट बोलत होते, तेव्हा जे लोक सावरकरांचं गुणगान गात होते, ते सरकारमध्ये बसल्यानंतर गप्प झाले.”
ADVERTISEMENT
शिवसैनिक आमच्यासोबत, शिंदेंचा दावा
सर्वसामान्य शिवसैनिक कुणाच्या पाठिंशी असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. या मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले, “बघा केडर मुद्दा असेल, तर शिवसेनेचे पूर्ण केडर आमच्यासोबत आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार मानणारे लोक आहोत. काम करणारे कोण आहेत, हे कार्यकर्त्यांना माहिती आहे. जेव्हा संकट येतात, तेव्हा कोण धावून येतं हे लोकांना माहिती आहे. 2024 मध्ये भाजप आणि शिवसेना युती पूर्ण बहुमताने जिंकेल”, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT