karnataka election 2023 date: कर्नाटकात बिगुल वाजला! 13 मे रोजी ‘निकाल’
karnataka assembly election 2023 full schedule : भाजप आणि काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कर्नाटकात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
ADVERTISEMENT
Karnataka assembly election 2023 full schedule: नवी दिल्ली: अखेर कर्नाटकात निवडणुकीचा बिगुल वाजला. मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी (29 मार्च) जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कर्नाटकातील दौरे वाढले होते, त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अंदाजाप्रमाणे आयोगाकडून कर्नाटक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. (Election Commission announced schedule for Karnataka election 2023)
ADVERTISEMENT
24 मे 2023 रोजी कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. कर्नाटकात 2018 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांपैकी भाजपने 104 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या. जदयूने 37 जागांवर विजय मिळवला होता.
कर्नाटक विधानसभा निवडणूक : मतदान आणि निकाल कधी?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून, 10 मे रोजी मतदान पार पडणार असून, 13 मे रोजी निकाल लागणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 : महत्त्वाच्या तारखा
-23 एप्रिल 2023 रोजी निघणार अधिसूचना
-20 एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
-21 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार
-24 एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख
-10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान
-13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार
कर्नाटकात एकूण किती आहेत मतदार?
-कर्नाटकात एकूण 5 कोटी 21 लाख 17 हजार 579 मतदार आहेत.
-यात यावेळी 9 लाख 17 हजार नवीन मतदारांचा समावेश आहे.
-100 पेक्षा जास्त वय असलेले 16 हजार मतदार आहेत.
-80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदार घरातून करू शकणार मतदान.
-1 एप्रिल रोजी ज्यांच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होतील, तेही करू शकणार मतदान.
-224 मतदार केंद्रावर युवा कर्मचारी असणार कर्तव्यावर
-100 मतदान केंद्रावर दिव्यांग कर्मचारी तैनात असणार.
ADVERTISEMENT
Election Commission Press Live : कर्नाटकच्या निवडणुकांचं बिगूल वाजलं, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद #ElectionCommissionPressLive #KarnatakElectionUpdate | #कर्नाटकनिवडणूक
https://t.co/CxzU7mSfdS— Mumbai Tak (@mumbaitak) March 29, 2023
ADVERTISEMENT
कर्नाटक विधानसभेतील सध्याचं पक्षीय बलाबल
-एकूण जागा 224, बहुमतासाठी लागणारी संख्या 123
– भाजपचे सध्या 117 आमदार असून, 2018 मध्ये 117 जागा, तर 2013 मध्ये 40 जागा मिळाल्या होत्या.
-काँग्रेसच्या आमदारांची संख्या 69 असून, 2018 मध्ये 80 जागा, तर 2013 मध्ये 122 जागा जिंकल्या होत्या.
-जेडीएसचे सध्या 32 आमदार असून, 2018 मध्ये 37 आमदार निवडून आले होते. 2013 मध्ये 40 जागा जिंकल्या होत्या.
-सध्या अपक्ष आमदारांची संख्या 6 असून, 2018 च्या निवडणुकीत 3 अपक्ष निवडून आले होते. 2013 मध्ये 22 अपक्ष आमदार निवडून आले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT