जरांगेंच्या मुलीचा सरकारला इशारा, ‘पप्पा मुंबईत पोहोचले तर घराबाहेरही पडता येणार नाही’
मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. यावर जरांगेंची मुलगी म्हणाली, त्यांना म्हणाव तुमचे शब्द तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, तुम्ही मराठ्यांचा इतका मोठा विश्वासघात केला आहे.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Daughter Ultimatum to Shinde Government : इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेला मोर्चा आता मुंबईच्या दिशेने वळवला आहे. त्यामुळे आज सकाळी आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगेंच्या या मुंबईतील मोर्चाने सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मराठा आरक्षणाची बैठक बोलावली आहे. असे असतानाच आता मनोज जरांगें पाठोपाठ आता त्यांची मुलीने देखील सरकारला गर्भित इशारा दिला आहे. (manoj jarange patil daughter pallavi jarange ultimatum eknath shinde government maratha reservatiom maharashtra politics)
ADVERTISEMENT
मनोज जरांगे यांची कन्या पल्लवी जरांगे हिने मुंबई तकशी बोलताना सरकारला इशारा दिला आहे. पप्पांची सकाळी पत्रकार परिषद पार पडली. त्या पत्रकार परिषदेत पप्पा रडले आणि भावूक झाले. कारण समाजाच्या वेदना इतक्या असताना, आतापर्यंत जो आला तो समाजासाठी आम्ही एवढं केलं तेवढं केलं हेच सांगत बसला. प्रत्यक्षात काहीही न करता ते राजकारणात घुसल्याचा हल्लाबोल पल्लवी जरांगेने मराठा नेत्यांवर केला.
हे ही वाचा : Sania Mirza सोबत घटस्फोट? शोएब मलिकने ‘या’ अभिनेत्रीसोबत केलं तिसरे लग्न..
पप्पा नक्कीच मुंबईला चालले आहेत आणि हे भंगवे वादळ मुंबईला घेऊन जाण्यास सरकारच याला जबाबदार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आरक्षण दिले तर ठिक आहे नाहीतर तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जरांगेंच्या मुलीने दिला आहे. तसेच मुंबईतील आंदोलनाला आम्ही जाणार नाही आहोत. पप्पांनी सांगितले आहे, मी आहे लढायला, ‘तुम्हीच घरीच थांबा. मी नक्कीच आरक्षण घेऊन परत येईन;, यांना आरक्षण द्यावचं लागणार आहे, असे जरांगेंच्या मुलीने सांगितले.
आता वेळ मिळणार नाही. शिष्टमंडळ पाठवा नाहीतर काहीही करा, तुमची मुंबई बंद होणारच. तुम्ही नुसता वेळकाढूपणा करताय. तुम्ही तर मागे 30 दिवस मागितले होते. त्याच्यात आरक्षण देणार होतात.मग आता 7 महिने उलटून गेले आहेत, आता तुम्ही 30 दिवसात काय देणार आहात? नाही दिलं तर तुमच्या मुंबईचे काय होते ते पाहा. पण इतकं आहे शांततेत आंदोलन होणार आहे, असे देखील जरांगेंच्या मुलीने सांगितले.
हे ही वाचा : NCP : क्या हुआ तेरा ‘दादा’? ‘तो’ व्हिडिओ शेअर केला अन् अजितदादांनाच घेरलं
मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. यावर जरांगेंची मुलगी म्हणाली, त्यांना म्हणाव तुमचे शब्द तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, तुम्ही मराठ्यांचा इतका मोठा विश्वासघात केला आहे. तुमच्या हातात आणखीण सहा दिवस आहेत.पप्पा मुंबईला येईपर्यंत तरी घोषणा करा आणि जर का पप्पा आणि हे भगवे वादळ मुंबईत घेऊन शिरले, तर तुम्हाला तुमच्या घराबाहेर देखील पडता येणार नाही, असा इशाराच जरांगेंच्या मुलीने सरकारला दिला.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT