‘पुढं-पुढं काय होतं, सरकारने बघावंच’, जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

maratha reservation government must see what happens next manoj jarange Patil warned government of maharashtra
maratha reservation government must see what happens next manoj jarange Patil warned government of maharashtra
social share
google news

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) सरकारने जाहीर करावं, नाही तर आता राज्याच्या कोपऱ्या कोपऱ्यातील मराठा समाजा (Maratha Community) जागा झाला आहे. त्यामुळे सरकारने आता वेळ न घालवता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे. सरकारने (Government of maharashtra) तात्काळ मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा उद्यापासून मी ना पाणी घेणार, ना उपचार घेणार ना सलाईन लावून घेणार असा इशारा आता मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

ADVERTISEMENT

राजगादीचा मान राखला

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाबरोबरच त्यांनी आपल्या तब्बेतेचीही काळजी घ्यावी असं म्हणत माजी खासदार संभाजीराजे यांनी जरांगे पाटील यांना पाणी घेण्याची विनंती केली. त्यावर छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज असून आम्ही राजगादीला मानणारे आहोत त्यामुळे त्यांच्या शब्दाला मान देत आम्ही पाणी घेतलं असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा >> Crime: पतीची हत्या अन् नंतर बनवला कढी-भात.. बँक मॅनेजरच्या विकृत पत्नीचं भयंकर कृत्य!

आत्महत्या करु नका

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आज पुन्हा इशारा देत सरकारने आता आरक्षणाविषयी ठोस भूमिका घेतली नाही तर उद्यापासून तीव्र आंदोलन करत पाणीही आणि कोणते इलाजही घेणार नाही असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी सांगितले राज्यातील मराठा समाजाला कोणीही आत्महत्या करु नका असं आवाहन करत हे आंदोलन शांततेच करणार असून या माध्यमातूनच आरक्षण मिळवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सगळ्यांना जेरीस आणणार

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता मराठा तरुणांनी रडायचं नाही, लढायचं आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करु नका. कारण मराठा आरक्षणासाठी शांततेत चाललेले आंदोलनच सरकारल जेरीस आणणार असल्याचा इशारा देत. या आंदोलनाच्या माध्यमातूनच मी सगळ्यांना जेरीस आणणार असल्याचा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

हे ही वाचा >> Crime: मुंबईतील पोलिसाने चक्क केली तरुणाची हत्या, कारण…

सरकारनं ठोस निर्णय घ्यावा

गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून फक्त अश्वासनं देण्यात येत असून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळेच आता मी निर्णय घेतला आहे की, चाललेल्या आंदोलनाला आता अधिक तीव्र करणार असून उद्यापासून मी आात पाणी, सलाईन आणि कोणताही इलाज न घेता तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सरकारला सांगितले आहे. त्याचबरोबर सरकारने आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पंजाबराव देशमुखांनी आणलेल्या कायद्यानुसार मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT