Manoj Jarange: ‘तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे आहेत..’, जरांगेची भुजबळांवर जहरी टीका
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये आज (23 डिसेंबर) मनोज जरांगे हे सभा घेणार आहेत. पण या सभेआधी मीडियाशी बोलताना जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Criticized Chhagan Bhujbal: बीड: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला वेळ हा उद्या (24 डिसेंबर) संपणार आहे. याआधी आज (23 डिसेंबर) मनोज जरांगे हे बीडमध्ये इशार सभा घेणार आहेत. मात्र, त्याआधी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे. (maratha reservation you have worms in your head like a sewer manoj jarange venomous criticism of chhagan bhujbal)
ADVERTISEMENT
‘मराठ्यांना वाटलेलं तू खूप चांगल्या विचारांचा आहेस. पण तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे आहेत. हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हतं.’ अशा शब्दात जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर टीका केली.
‘सरकार एका मिनिटात निर्णय घेऊ शकतं, पण…’
सरकार एका मिनिटात पण निर्णय घेऊ शकतो. पण मराठ्यांची गरज नाही अशा भावनेतून ते चालतात. त्या एकट्यांचीच गरज आहे त्यांना अशी त्यांची भावना आहे. ठीक आहे.. लक्षात आलंय समाजाच्या.. त्यांना तो एकटाच पाहिजे. सगळं राज्याच त्याच्या हातात आहे ना… तुम्हाला असं वाटतंय ना.. ठीकए.. ऐका त्याचं करा मराठ्यावर अन्याय.. मराठा कसं आरक्षण मिळवतात ते पाहा.. असं जरांगे-पाटील यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
‘तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे आहेत’
‘भुजबळांची एवढी चांगली नियत असती.. आणि हे जर मराठ्यांना आधी कळालं असतं.. तू इतक्या खालच्या दर्जाच्या विचाराचा आहेस तर तुला इतकं मोठं केलंच नसतं. मराठ्यांना वाटलेलं तू खूप चांगल्या विचारांचा आहेस. पण तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे आहेत. हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हतं. त्यांनी तुला चांगलं समजलं आणि तुला मोठं केलं. पण आता लोकांना कळायला लागलं की, याच्यात किती गटारगंगा होती. आता मराठ्यांच्या लक्षात आलं..’
हे ही वाचा>> राज ठाकरेंच्या मुलीला सोशल मीडियावर कोण देतंय त्रास?, शर्मिला ठाकरे तर संतापल्याच!
‘आधी मराठ्यांना माहीत नव्हतं. कुचकं बोलतो काय.. अरे आम्ही रानात आवतं हाणणारे लोकं आहोत. आम्हाला कुचके, चांगले शब्द लगेच कळतात. तू नको आमच्या नादी लागू..’ अशा जहरी शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्याव टीकेची झोडच उठवली.
ADVERTISEMENT
‘आणखी वेळ देणार नाही..’
‘महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट आरक्षण यावर मी ठाम आहे.. फक्त त्यांनी 4 शब्द घेतले होते. त्या शब्दांवर देखील आम्ही तयार आहोत. सरसकट शब्द नको ना.. तर चार शब्द आहेत त्यावर घ्या. चर्चाच कधीपर्यंत करायची.. आता कंटाळलोय.. आता वेळ वैगरे देत नाही. चर्चेतून मार्ग निघतो पण आम्ही थांबत नाही. आम्हाला आरक्षण हवं आता.. आता आणखी वेळ देणार नाही.’ असं स्पष्ट शब्दात जरांगे पाटील यांनी सरकारला सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Shiv Sena UBT: ‘संसदेची जीभ छाटली आहे’, ठाकरे गटाचा मोदींवर थेट वार
‘यांनी शक्यतो मोठ्या जातीच टार्गेट केल्या आहेत’
‘त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाहीए.. त्यांची अशी इच्छा आहे की, मराठेच राज्यात ठेवायचे नाही. यांनी प्रत्येक राज्यातील शक्यतो मोठ्या जातीच टार्गेट केल्या आहेत. याचाही अभ्यास केलाय. यांचे बरेचसे डाव आमच्या लक्षात येऊ लागले आहेत.’ असा गंभीर आरोप देखील जरांगे-पाटील यांनी यावेळी केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT