Uddhav Thackeray: अदाणींमुळे मविआ सरकार पडलं?, उद्धव ठाकरेंचा प्रचंड मोठा गौप्यस्फोट

रोहित गोळे

ADVERTISEMENT

mva government fell due to gautam adani uddhav thackeray very serious accusation dharavi morcha mumbai shiv sena ubt
mva government fell due to gautam adani uddhav thackeray very serious accusation dharavi morcha mumbai shiv sena ubt
social share
google news

Uddhav Thackeray serious accusation Gautam Adani: मुंबई: धारावी पुर्नविकासाचा प्रकल्प अदाणी समूहाला देण्यास शिवसेना (UBT) पक्षाने प्रचंड विरोध केला असून त्याविरोधात आज (16 डिसेंबर) मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला होता. ज्यामध्ये सर्व पक्ष सामील झाले होते. मात्र, याच मोर्चाला संबोधित करताना शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. आपलं सरकार पाडण्यासाठी अनेक खोके ‘त्यांनी’ पुरवले असा दावा करत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे गौतम अदाणींवर निशाणा साधला. (mva government fell due to gautam adani uddhav thackeray very serious accusation dharavi morcha mumbai shiv sena ubt)

ADVERTISEMENT

‘मी मुख्यमंत्री असेपर्यंत मुंबई गिळता येणार नाही.. हे समजल्यामुळेच त्यांनी माझं सरकार पाडलं. त्यासाठी खोके पुरवले गेले… आता खोके कोणाकडून गेले असतील. विमानं कोणी पुरवली असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल. हे तुम्हाला माहितीच आहे.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे गौतम अदाणींवर आरोप केले आहेत.

हे ही वाचा>> Dharavi: ‘विकासाला विरोध नाही तर अदानींना…’, ठाकरे गट अदानींच्या कार्यालयावर धडकणार

‘खोके दिले… विमानं पुरवली, हॉटेल बुकिंग कोणी केलं?’, वाचा उद्धव ठाकरे अदाणींबाबत काय-काय बोलले

मी मुख्यमंत्री असताना जो मी नागरिकांना बाजूला ठेवून जो मी बिल्डर्ससाठी दिला. बिल्डरधार्जिणे तुम्ही आहात. हा लढा धारावीचा राहिलेला नाही हा महाराष्ट्राचा झालेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल अडीच वर्ष यशस्वीपणे चाललेलं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं.. ते खोके कोणी पुरवले असतील. आता तुम्हाला लक्षात आलं असेल.. खोके कोणाकडून गेले असतील. विमानं कोणी पुरवली असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल.

मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल. आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत. पण ज्या-ज्या वेळी मुंबईवर संकट आलं.. तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक.. पण त्यांना जेव्हा कळलं की, जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबईला गिळता येणार नाही. मग हे सगळं कट-कारस्थान शिजवलं नाही ना? असा प्रश्न माझ्या मनात येतो.

हे सगळे खोके.. खोके सरकार.. 50 खोके एकदम ओके.. कशासाठी, कोणासाठी आणि कोणी दिले हे आता उघडकीस आलं आहे. कारण आपलं सरकार असताना आपण सांगा.. अडीच वर्षाच्या काळात धारावीचा गळा घोटू असा एक तरी जीआर काढला का?

ते जे काही सांगतायेत.. 2018 वैगरे.. अरे तुम्हीच तिथे बसला होतात. आम्ही तुमच्यासोबत होतो. त्यामुळे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रचं आहे आमचं नाहीए. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अदाणींसोबत भाजपवर टीकेची झोड उठवली.

हे ही वाचा>> Uddhav : ठाकरेंचा फडणवीसांवर जोरदार हल्ला, ‘तुम्ही अदानीचं बुट चाटताय’

दरम्यान, आता उद्धव ठाकरेंच्या या आरोपानंतर भाजप आणि विशेषत: शिंदे गट नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT