‘माझं मेस्सीसारखं झालंय’, एकनाथ शिंदेंवर घणाघात, आदित्य ठाकरे काय म्हणाले?
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘मुंबई Tak बैठक’मध्ये शिवसेनेतील बंडखोरीनंतरचा अनुभव सांगितला.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘मुंबई Tak बैठक’मध्ये शिवसेनेतील बंडखोरीनंतरचा अनुभव सांगितला. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाच्या प्रश्नावर भाष्य करताना एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांवर घणाघाती टीका केली.
ADVERTISEMENT
प्रश्न -मागील 9 महिने तुमच्यासाठी कसे होते? डोकेदुखीचे, तणावाचे? राजकारणाचं बाळकडू घरातून मिळालं, पण त्याच्याहून जास्त 9 महिन्यांनी काय शिकवलं?
आदित्य ठाकरे – जे 9 महिने निघून गेले आहेत, त्याच्यात खूप लोक असं विचारतात की, यात काय शिकलात? का असं घडलं? पण, याचा विचार करायला वेळच मिळाला नाही. फिरतीवर आहे. अनेक नवीन लोक पक्षात येत आहेत. काही सोडून जात आहेत. कधी एकटा बसतो, कधी विचार करायला वेळ मिळतो, तेव्हा एवढाच विचार येतो की, यांना काय कमी केले आणि माणसांवर विश्वास किती ठेवायचा? ज्यांना सगळं दिलं ते निघून गेले आणि ज्यांना काही मिळालं नाही, ते सोबत आहेत.”
हेही वाचा >> ऋतुराज गायकवाडसोबत अफेअर…? मुंबई Tak बैठकीत अभिनेत्री सायली संजीव स्पष्टच म्हणाली…
हा एक नऊ महिन्यांचा प्रवास आहे. लढणार हे नक्की आहे. इतकी वर्ष त्यांना कुटुंबातील मानलं. त्यांच्यासाठी सगळं केलं. ही माझी मनस्थिती असेल, तर मी विचार करतो की, माझे वडील काय विचार करत असतील. या सगळ्यांना नगरसेवकाच्या तिकिटापासून ते मंत्री बनवण्यापर्यंत हे उद्धव साहेबांनी केलं. त्यामुळे एखादी व्यक्ती तुमच्यावर इतका विश्वास टाकते, सगळं देते काही न मागता. तुम्ही त्याचं व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसता, खोटं बोलता. त्याची बदनामी करता. पक्ष सोडणं वेगळी बाब. अनेक लोक पक्ष सोडतात, दुसऱ्या पक्षात जातात, पण त्यांनी पक्ष चोरला नाही. जे केलं, ते नाकारून त्यांना शिव्याशाप देणं, हे किती योग्य आहे. माणुसकीवर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्न उभा राहतो. 40 गँग सोडली तर दुसरी बाजू बघितली की, तर जिथे फिरतोय, तिथे लोकांचं प्रेम दिसत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
प्रश्न – पहिल्या प्रयत्नात आमदार झालात, मंत्री झालात. तितक्याच लवकर तुम्हाला संघर्षाचा सामना करावा लागला. जो खूप कमी जणांना लागतो. असं कधी वाटतं का की हा संघर्ष माझ्याच वाट्याला का आला?
आदित्य ठाकरे – ते आहे ना मै नहीं तो कौन बे? तसं आहे ते. मी त्या संघर्षाच्या मध्ये नसतो, म्हणजे मी त्यांना महत्त्वाचा नाही. कदाचित त्यांना माझी भीती वाटायला लागली, ती कशासाठी मला माहिती नाही. प्रत्येक बैठकीत मी त्यांना प्राधान्य द्यायचो, महत्त्वाची खुर्ची द्यायचो. मी सगळ्यांचा आदर सन्मान मी राखत आलो. गेल्या अडीच वर्षात बघाल, तर मी स्वतःच्या लोकांवर कधीच नाही पण विरोधी पक्ष नेत्यांवर पातळी सोडून कधीही बोललो नाही.आता राजकारणात काय चाललंय, तर मुद्दे सोडून सगळं काही बोलतोय. धर्माबद्दल बोलतोय. सगळ्याबद्दल बोलतोय, पण महागाईवर काहीही बोलत नाही. बेरोजगारीवर कुणी बोलत नाहीये. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, असा विचार करायला पाहिजे की, जेव्हा मेस्सी फुटबॉलच्या मैदानावर उतरतो, तेव्हा सगळे त्याला मार्क का करतात, कारण तो त्या फिल्डवरचा सगळ्यात महत्त्वाचा माणूस असतो, तसं माझं झालंय”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT