शरद पवारांच्या ‘त्या’ गुगलीवर गेली अजित पवारांची विकेट? फडणवीस ‘सेफ’?
पहाटेच्या शपथविधीवरून पवार-फडणवीसांत जोरदार कलगीतुरा रंगलाय. पण या सगळ्यांत पवारांच्या गुगलीवर पुतणे अजित पवारांचीच विकेट गेल्याची चर्चा सुरू झालीये.
ADVERTISEMENT
Sharad Pawar vs Devendra Fadnavis : आपल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीसांनी विकेट दिली, असा दावा शरद पवारांनी केला. यावर फडणवीसांनीही पवारांना जशास तसं उत्तर दिलं. पहाटेच्या शपथविधीवरून पवार-फडणवीसांत जोरदार कलगीतुरा रंगलाय. पण या सगळ्यांत पवारांच्या गुगलीवर पुतणे अजित पवारांचीच विकेट गेल्याची चर्चा सुरू झालीये. नेमकी ही चर्चा काय, पवारांच्या गुगलीवर अजित पवार खरंच क्लीनबोल्ड झालेत का? (NCP chief Sharad Pawar admitted that after the 2019 assembly elections in Maharashtra had discussions with the BJP.)
ADVERTISEMENT
शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी शरद पवारांवर स्फोटक आरोप केले.
हेही वाचा >> ‘..तर मी विकेट घेणारच ना’, पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचे गौप्यस्फोट; फडणवीसांना टोले
पहाटेच्या शपथविधीआधी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या गुप्त भेटींचा वृत्तांत फोडला. पवारांशी झालेल्या बोलणीनंतरच सरकार स्थापनेचा निर्णय झाला. पण तीन-चार दिवस आधीच पवारांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी नकार कळवल्याचा दावा फडणवीसांनी केला. त्यानंतरही फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेऊन 23 नोव्हेंबर 2019 रोजी भल्यासकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण, अवघ्या काही तासांतच पहाटेचं हे सरकार पत्त्यासारखं कोसळलं.
हे वाचलं का?
पहाटेचा शपथविधी शरद पवारांचा डाव?
या सगळ्याला साडेतीन वर्ष झाली, तरी अजून या शपथविधीचं कवित्व संपेना. अशातच फडणवीसांनी पुन्हा एकदा पवारांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला. याच आरोपांना पवारांनीही पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. पवारांनी फडणवीस सत्तेसाठी किती अस्वस्थ आहेत, हे दाखवून देण्यासाठीच आपण हा डाव टाकल्याची जाहीर कबुली दिली.
पवार म्हणाले, “त्यांनी जे (देवेंद्र फडणवीस) सांगितलं की, ते भेटले ही गोष्ट खरी आहे. अनेक गोष्टींची चर्चा केली, हेही खरं आहे. पण, त्यांनी (फडणवीस) स्वत:च काल सांगितलं की, या संबंधीचं धोरण मी 2 दिवस आधी बदललं. जर मी दोन दिवसांआधी धोरण बदललं होतं, तर त्यानंतरच्या दोन दिवसांनी त्यांनी चोरून शपथ घ्यायचं काय कारण होतं?”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Lok Sabha 2024 : नितीश कुमार पहिली परीक्षा पास, 1998 सारखा चमत्कार होणार?
शरद पवार असंही म्हणाले की, “हा डाव होता की काय होता मला माहिती नाही, पण माझे सासरे होते; त्यांचे नाव सदू शिंदे. ते देशातील उत्तम गुगली बॉलर होते. त्यांनी मोठ्या मोठ्या लोकांच्या विकेट्स घेतल्या होत्या आणि मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठे टाकायचा, मी जरी खेळलो नसलो तरी माहित होतं. यापेक्षा जास्त काही विचारू नका. आता विकेट दिली, तर करायचं काय? ती विकेट घेतलीच पाहिजे. ते काही म्हणतील आता… ते त्यांची विकेट गेलीए हे सांगतायेत का?”
ADVERTISEMENT
“देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी काय करू शकतात.. कुठे जाऊ शकतात.. कितवर जाऊ शकतात.. या सगळ्यासंबंधीची ही स्थिती आहे”, असं सांगत पवारांनी थेट भाजप सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार होती, असा ठपकाच ठेवलाय. नकार कळवल्यानंतरही चोरून पहाटे शपथ का घेतली, असं सांगत फडणवीसांची सत्ताखेळी उघड करण्याचाही प्रयत्न केला.
पवारांच्या गुगलीला फडणवीसांनी काय दिलं उत्तर?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एवढंच आहे की, त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड व्हायच्या ऐवजी त्यांचे पुतणे अजित पवारच बोल्ड झाले. त्यांनी स्वत:च्या पुतण्यालाच बोल्ड केलं आहे. पण, काही हरकत नाही. उरलेलं सत्य लवकरच बाहेर येईल.”
पवारांच्या गुगलीनं माझी नाही, तर पुतणे अजित पवारांची विकेट गेल्याचा दावा फडणवीसांनी केला. फडणवीसांच्या याच दाव्यानं नवा ट्विस्ट निर्माण झालाय. शरद पवारांनी भाजपला नकार कळवल्यानंतरही अजित पवार पहाटेच्या शपथविधीसाठी का गेले? पवारांना गुगली टाकून अजितदादांनाही उघडं पाडायचं होतं का, असे प्रश्न उपस्थित झालेत.
हेही वाचा >> ‘पवारांच्या तोंडून सत्य.. गुगलीमुळे माझ्याऐवजी त्यांचे पुतणेच..’, फडणवीसांचा पलटवार
विशेष म्हणजे, फडणवीसांनी अजित पवारांसमोर भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असा दावा केल्यानं या सगळ्या प्रकरणालाच नवं वळण मिळालंय. पण या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं, पवारांच्या गुगलीवर कोणाची विकेट गेली, फडणवीसांची की अजितदादांची? याबद्दल अजूनतरी अर्धसत्यच बाहेर आल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT