No-Confidence Motion: लोकसभेत ‘INDIA’आघाडीचा पराभव, मोदींनी नेमका कसा मिळवला विजय?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

no confidence motion brought by india alliance in the lok sabha was rejected and modi government won political news headlines today
no confidence motion brought by india alliance in the lok sabha was rejected and modi government won political news headlines today
social share
google news

No-confidence motion debate: नवी दिल्ली: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर (no-confidence motion) आज (10 जुलै) जोरदार चर्चा झाली. अंतिम मतदानावेळी विरोधी पक्षाचा एकही खासदार उपस्थित नसल्याने अविश्वास प्रस्ताव संमत झाला नाही. त्यामुळे मोदी सरकारचा (Modi Govt) एकतर्फी विजय झाला. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. (no confidence motion brought by india alliance in the lok sabha was rejected and modi government won political news headlines today)

ADVERTISEMENT

गुरुवारी लोकसभेच्या कामकाजात बराच गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी आघाडी INDIA ने आणलेला अविश्वास प्रस्तावात मोदी सरकारने एकतर्फी बाजी माजली. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी INDIA आघाडीला अहंकारी आघाडी असंही संबोधलं. यावरून राहुल गांधींवर देखील जोरदार निशाणा साधण्यात आला.

हे ही वाचा>> ‘…पण यांनी भारत मातेचे तीन तुकडे केले’, राहुल गांधींवर PM मोदींचा घणाघात

मणिपूर हिंसाचाराचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, ‘देशाने आमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल.’ मंगळवारपासून अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली होती. ती आज तीन दिवसांनी संपली. .

हे वाचलं का?

लोकसभेत भारत आघाडीचा अविश्वास ठराव फेटाळला

पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना विरोधक बराच वेळ घोषणाबाजी करत होते. मोदींनी मणिपूरच्या मुद्द्यावर भाष्य करावं असं ते म्हणत होते. मात्र, त्याकडे लक्ष नेते मोदींनी इतर विषयावरील आपलं भाषण सुरू ठेवलं. ज्यामुळे अखेर विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतरच मोदींनी मणिपूर हिंसाचारावर आपलं मत मांडलं. त्यानंतर देखील ते इतर वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलले. तब्बल 2 तास 13 मिनिटांनंतर त्यांनी आपलं भाषण संपवलं. ज्यानंतर लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले. जेव्हा सभागृहात मतदान पार पडलं तेव्हा फक्त सत्ताधारी खासदारच हजर होते. त्यामुळे अविश्वास प्रस्तावावर आवाजी मतदान घेण्यात आलं. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही आणि पर्यायाने मोदी सरकारने एकप्रकारे विजय मिळवला.

मोदींनी फक्त ‘यासाठी’ केलं विरोधकांचं कौतुक

दरम्यान, ‘पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून विरोधकांना टोमणेही मारले. ते म्हणाले की, ‘मला एका गोष्टीसाठी विरोधी पक्षातील सहकाऱ्यांचे कौतुक करायचे आहे. तसे ते सभागृह नेत्याला नेता मानत नाहीत. पण एका गोष्टीसाठी मी त्याची स्तुती करेन. सभागृह नेता म्हणून मी त्यांना एक काम दिले होते. 2023 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणा असे मी म्हटले होते. त्या लोकांनी अविश्वास प्रस्ताव आणत माझी आज्ञा पाळली.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> No Confidence Motion : सर्व रेकॉर्ड मोडून 2024 मध्ये परत येऊ; PM मोदींचा पलटवार

‘पण मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की, त्यांना पाच वर्ष मिळाली, त्यांनी थोडी तयारी करायला हवी होती, काही मुद्दे शोधायचे होते.. पण त्यांनी देशाची निराशा केली आहे. 2028 मध्ये त्यांनी पुन्हा प्रयत्न करावा. 2028 मध्ये तुम्ही अविश्वास प्रस्ताव आणाल तेव्हा तयारी करून या. अशा क्षुल्लक गोष्टी समोर आणू नका, देशाला असे वाटले पाहिजे की किमान तुम्ही विरोध करण्यास सक्षम आहात, तुम्ही ती क्षमताही गमावली आहे.’ असं म्हणत मोदींनी विरोधकांना टोमणे लगावले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT