No Confidence Motion : राहुल गांधी पुन्हा खासदार, PM मोदींचं टेन्शन वाढणार?
मणिपूर हिंसाचारावरून काँग्रेसने सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यातच आता राहुल गांधींची खासदारकी बहाल झाली. त्यामुळे लोकसभेत मोदींना घेरण्याचा प्रयत्न होताना दिसेल.
ADVERTISEMENT
Rahul Gandhi latest news : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर राहुल गांधी लोकसभेत परतले. लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधींची खासदारकी बहाल करण्यात आली. खासदारकी परत मिळताच राहुल गांधींनी लोकसभेत हजेरी देखील लावली. राहुल गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेसबरोबरच ‘इंडिया’ आघाडीचे सगळे नेते हजर होते. राहुल गांधींनी पुन्हा लोकसभेत पाऊल ठेवलं आणि काही वेळातच काँग्रेसवर गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद पाडलं. पण, या सगळ्यात राहुल गांधींच्या लोकसभेत परतण्याने मोदींचं टेन्शन कसं वाढण्याची शक्यता आहे. ते कसं हेच समजून घेऊयात…
पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर विरोधकांनी मणिपूरच्या प्रश्नावरुन रान उठवलं. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवेदन करावं, अशी मागणी विरोधकांनी केली. मोदींनी मणिपूरबाबत एक प्रतिक्रिया दिली होती, त्यापलीकडे अद्याप कुठलंही निवेदन आलेलं नाही. त्यामुळे या प्रश्नावर मोदी काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राहुल गांधींची खासदार प्रकरण
दरम्यान, राहुल गांधींनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. हीच शिक्षा गुजरात हायकोर्टाने कायम ठेवली. नियमाप्रमाणे दोन किंवी त्यापेक्षा अधिक वर्षाची शिक्षा झाल्यास त्या सदस्याचं सदस्यत्व रद्द होतं. राहुल गांधींचंही तेच झालं. दोन वर्षाची शिक्षा झाली आणि लोकसभेचं सदस्यत्व रद्द झालं. त्यानतंर त्यांना त्यांचं सरकारी घर देखील सोडावं लागलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाचा >> Nitin Desai: नि:शब्द शोकांतिका! धनुष्यबाण बनवला अन् मधोमध उभं राहून घेतला गळफास
या शिक्षेच्या विरोधात राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली. या स्थगितीमुळे राहुल गांधींचा लोकसभेत परतण्याचा मार्ग मोकळा झाला. आता लोकसभेत मणिपूर प्रश्नावर चर्चा होऊ शकलेली नाही. विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब झालं. मणिपूरवर मोदींनी बोलावं अशी विरोधकांची मागणी आहे. मोदी बोलत नसल्याने अखेर लोकसभेत सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला अध्यक्षांनी मान्यता दिली.
मणिपूर हिंसाचार, अविश्वास प्रस्ताव
आता सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आल्यानंतर त्यावर मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांनी उत्तर देणं अपेक्षित असतं. त्यामुळे या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींना सभागृहात निवेदन करण्यास भाग पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न ठरला आहे.
ADVERTISEMENT
आता या अविश्वासाच्या प्रस्तावावर 8 आणि 9 ऑगस्टला चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 10 ऑगस्टला मोदी यावर निवेदन देण्याची शक्यता आहे. या आधीच राहुल गांधींना त्यांची खासदारकी परत मिळाल्याने अविश्वास ठरावाच्या चर्चेला राहुल गांधी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
वाचा >> NCP: ‘जयंत पाटील.. पुण्यात अमित शाहांना भेटले?’, अजित पवारांचं मोठं विधान
मणिपूर प्रश्नावरुन राहुल गांधी मोदींना घेरण्याची शक्यता आहे. त्यासाठीच अविश्वास प्रस्तावाच्या आधी राहुल गांधींना त्यांची खासदारकी पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेस आग्रही होती. आता शिक्षेला स्थगिती दिल्याने काँग्रेसकडून राहुल गांधींना खासदारकी परत देण्याची मागणी करण्यात आली. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचा निकाला आला. शनिवार रविवार सचिवालयाला सुट्टी असल्याने सोमवारी याबाबतचा निर्णय घेण्यात आला आणि राहुल गांधींना पुन्हा खासदारकी देण्यात आली. आता खासदारकी मिळाल्यानंतर लगेचच राहुल गांधींनी संसदेत हजेरी लावली. राहुल गांधी सभागृहात येताच सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत सभागृह दुपारपर्यंत बंद पाडलं.
राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरणार!
आता दोनच दिवसात अविश्वासाच्या ठरावावर लोकसभेत चर्चा होणार आहे. अर्थात लोकसभेत सरकारचं बहुमत असल्याने हा ठराव संमत होणार नाही. परंतु या ठरावाच्या निमित्ताने राहुल गांधी मोदींना घेरण्याची शक्यता आहे. या आधी देखील अनेक भाषणांमध्ये राहुल गांधींनी मोदींना लक्ष केलं होतं. राहुल गांधींनी मोदींना हिंडेनबर्ग रिपोर्टवरून घेरलं होतं. हा मुद्दा खुपच गाजला होता.
वाचा >> ऑफिस असो की घर, वेळीच व्हा सावध! जास्त वेळ बसल्याने ‘या’ गंभीर आजारांचा धोका
आता गेलेली खासदारकी पुन्हा मिळाल्याने राहुल गांधी मोदींना घेरण्याची शक्यता आहे. त्यातच भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचा आत्मविस्वास देखील वाढला आहे. आता सरकारला घेरण्याची नामी संधी राहुल गांधींकडे चालून आल्याने संसदेच त्यांचं वेगळं रुप पाहायला मिळू शकतं. आता मणिपूरच्या चर्चेपासून दूर राहणाऱ्या मोदींना या अविश्वासाच्या ठरावाचा सामना करावा लागणार आहे.
ADVERTISEMENT