Ram Mandir : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान’, रोहित पवार गोविंदगिरी महाराजांवर भडकले
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार चांगेलच भडकले आहेत. इतिहासाचे चुकीचे दाखले देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
ADVERTISEMENT
Rohit Pawar Reaction On Swami Govind dev Giri Maharaj Statement : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना संन्यास घ्यायचा होता, असं विधान केले होते. या विधानावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार चांगेलच भडकले आहेत. इतिहासाचे चुकीचे दाखले देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. (rohit pawar angry on swamy govind dev giri maharaj on ram mandir inauguration speech ayodhya narendra modi)
ADVERTISEMENT
रोहित पवारांच ट्विट जसच्या तस
सन्माननीय गोविंदगिरी महाराज,
आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू #श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून #छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही.
हे वाचलं का?
#छत्रपती_शिवाजी_महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत, ही विनंती!
सन्माननीय गोविंदगिरी महाराज,
आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू #श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून #छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही.#छत्रपती_शिवाजी_महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही… pic.twitter.com/hvnRDj76f6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 22, 2024
ADVERTISEMENT
गोविंदगिरी महाराज काय म्हणाले होते?
‘लोकांना माहिती नाही की, जेव्हा शिवाजी महाराज हे मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेले होते तेव्हा त्यांनी तीन दिवस उपवास केला आणि तीन दिवस शिव मंदिरात राहिले. महाराजांनी तेव्हा असं म्हटलं की, मला राज्य करायचं नाही.. मला संन्यास घ्यायचा आहे. मी शिवाच्या आरधनेसाठी जन्म घेतलाय. मला संन्यास घ्यायचा आहे. मला परत घेऊन जाऊ नका.’
ADVERTISEMENT
‘इतिहासातील तो विलक्षण प्रसंग आहे. त्यावेळी त्यांच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजवलं की, आणि त्यांना परत आणलं. त्यांना सांगितलं की, तुमचं हे कार्य देखील भगवत सेवाच आहे.’ असं गोविंदगिरी महाराज यांनी विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT