Rohit Pawar : …तर अजित पवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढतील? रोहित पवारांच मोठं विधान
राष्ट्रवादीचे अनेक नेते बंडखोरी करून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे काही नेत्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. त्याच्या या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्हावर येत्या 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणी आधीच शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) मोठं विधान केले आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते बंडखोरी करून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे काही नेत्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. त्याच्या या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (rohit pawar big statement on ajit pawar criticize bjp sharad pawar pune)
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते. राष्ट्रवादीत बंडखोरी करून अनेक नेते भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. काही नेत्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. अजित पवारांचीही अशीच स्थिती होऊ शकते का? या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, भाजपला लोकनेते आवडत नाहीत. भाजपने अनेक नेत्यांची राजकीय कारकीर्द संपवली आहे. त्यामुळे भाजपने वरपासून खालपर्यंत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास असे होऊ शकते,अशी शंका रोहित पवांरानी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : ‘सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक, तर अजित पवार…’, गोपीचंद पडळकरांचं सुटलं भान
ठाकरे आणि शिंदे गटात फूट पाडून भाजपने जी खेळी खेळली, तीच खेळी भाजप राष्ट्रवादीसोबत खेळणार आहे. पण शरद पवार यांना राजकीय जीवनाचा 60 वर्षांचा अनुभव असून ते भाजपचे बाप आहेत. सध्या अशी परिस्थिती आहे की भाजपला काय पाहिजे हे शरद पवारांना चांगलेच माहिती आहे. भाजपला जे पाहिजे आहे ते शरद पवार देत नाही आहेत,त्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. भाजप शरद पवार यांचे कुटुंब आणि पक्ष फोडण्यासाठी जबाबदार आहे. त्यामुळे भाजपबद्दल काय बोलायचे, असा सवाल रोहित पवारांनी केला.
हे वाचलं का?
गोपिचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
शरद पवार भाजपाचे बाप आहेत, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते.या विधानावर प्रत्युत्तर देताना गोपिचंद पडळकर म्हणाले की, रोहित पवाराला हे माहित नाही, शरद पवारांसारखी 500 लोक संपूर्ण देशात भाजपात आहेत. हे कुठल्या कोपऱ्य़ात पिल्लू बसेल, हे पण कळणार नाही, अशी खिल्ली पडळकरांनी उडवली. महाराष्ट्रात चालतं म्हणून ते बोलत राहतात. सध्या त्यांचा भावनिक टायमिंग आहे. 2024 ला हे दिसतील परंतू 2029 ला हा पक्ष आणि ही लोक तुम्हाला दिसणार नाहीत,अशी भविष्यवाणी देखील गोपिचंद पडळकरांनी केली आहे.
हे ही वाचा : Shiv Sena Mlas case : सरन्यायाधीशांचे विधानसभा अध्यक्षांना खडेबोल, समजून घ्या 9 मुद्द्यांमध्ये
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT