सावरकर वाद: संजय राऊतांची थेट राहुल गांधी, सोनियांशी चर्चा; भाजपचं टेन्शन कायम!
राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचे महाराष्ट्राच्या राजकारणात पडसाद उमटले. त्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीपासून दूर जाणार का, अशीही चर्चा सुरू झाली. मात्र, या वादावर अखेर महाविकास आघाडीत पडदा पडला आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाने महाविकास आघाडीत पुन्हा पेच उभा झाल्याचं पाहायला मिळालं. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे उद्धव ठाकरे यांनी थेट राहुल गांधींवर टीका केली आणि इशाराही दिला. दुसरीकडे भाजप-शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरत ठाकरेंची चांगलीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला. (savarkar-row-everything-is-okay-says-sanjay-raut-after-meet-sonia-gandhi-rahul-gandhi)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींनी केलेल्या विधानाबद्दलची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीच्या सभांची तयारी सुरू असतानाच या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये बिनसत की काय? असा चर्चेनं डोकं वर काढलं होतं.
शरद पवारांची मध्यस्थी, राहुल गांधींची सहमती
दरम्यान, सावरकरांवरील विधानामुळे उद्धव ठाकरेंबरोबर महाराष्ट्रात एकूणच महाविकास आघाडीचीच कोंडी झाल्याचं बघायला मिळालं. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेत मध्यस्थी केली. सावरकरांचा मुद्दा महाविकास आघाडीला अडचणी आणणारा असून, त्याबद्दल बोलणं टाळायला हवं, अशा आशयाची भूमिका पवारांनी दिल्लीतील बैठकीत मांडली. त्यावर काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला.
संजय राऊतांची राहुल गांधी, सोनिया गांधींसोबत चर्चा
विरोधी पक्षाच्या बैठकीला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार गैरहजर होते. सावरकर मुद्द्यांमुळे पाठ दाखवल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर या मुद्द्यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी थेट काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली.
हेही बघा – ‘राहुल गांधी यांच्या थोबाडीत मारुन हिंमत दाखवणार का?’ एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर संजय राऊतांनी एक ट्विटही केलं आहे. यात संजय राऊत म्हणाले, “श्रीमती सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी यांची आज भेट झाली.अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी.”
ADVERTISEMENT
‘महाविकास आघाडीत दरी नाही’, काँग्रेसची भूमिका आली समोर
राहुल गांधींनी सावरकरांबद्दल विधान केलं, ज्यामुळे महाविकास आघाडीत दरी निर्माण झाली. उद्धव ठाकरे यांचा पक्ष विरोधी पक्षाच्या बैठकीतही सहभागी झाला नाही. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा म्हणाले, “याला दरी निर्माण झाली म्हणणं चुकीचं आहे. कोणतीही दरी निर्माण झालेली नाही. निरोगी लोकशाहीत, निरोगी खुल्या विचाराधारेत संवाद आणि चर्चा होत राहायला हवी. मग असं होऊ शकतं की, एकमेकांच्या मतांशी सहमत नसू, पण संवाद बंद व्हायला नको. मी माझे विचार मांडेन, तुम्ही तुमचे विचार मांडा. विचारांची देवाण घेवाण होत राहायला हवी, तेव्हाच हा प्रवाह सुरू राहिली. त्यामुळे ही दरी नाहीये, तर संवाद आहे. मनमोकळेपणाने हा संवाद होत आहे.”
ADVERTISEMENT
हेही बघा – चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,’…तर मी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करेन, धमक असेल तर त्यांनी…’
“त्यांना त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार आहे, तसाच आम्हाला आमचा विचार मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही देशहितासाठी एकत्र आलोय. आमची समन्वय समिती आहे. आज महाविकास आघाडीत दरी, विसंवाद असं काही नाही. आमच्यात कोणताही वाद नाही”, असं पवन खेरा यांनी स्पष्ट केले.
भाजपचं टेन्शन कायम!
राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेली विधान परिषद निवडणूक आणि अलिकडेच झालेली कसबा, चिंचवड पोटनिवडणूक, यात भाजपला धक्का बसला. विशेषतः कसबा पोटनिवडणुकीच्या निकालामुळे महाविकास आघाडी कायम राहिली, तर आगामी निवडणुकांत भाजपसाठी आव्हानात्मक असेल, असं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी कायम न राहणे भाजपसाठी फायद्याचे आहे. सावरकरांच्या मुद्द्यामुळे उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असला, तरी महाविकास आघाडीतून ठाकरे बाहेर पडणार नाही, हे सध्या तरी निश्चित झालं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT