Savarkar row: शरद पवार उद्धव ठाकरेंच्या बाजूने, राहुल गांधींना सुनावलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad pawar Reaction on Savarkar Row say's Savarkar was freedom fighter
Sharad pawar Reaction on Savarkar Row say's Savarkar was freedom fighter
social share
google news

Sharad pawar Statement on Savarkar Row after Rahul Gandhi’s Remarks : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा चर्चेत आला आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पर्यायाने उद्धव ठाकरे यांची कोंडी झाल्याची स्थिती आहे. भाजप आणि शिवसेनेने उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले असतानाच दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरेंच्या बाजूने भूमिका घेतली आहे. सावरकर वादाच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवारांनी राहुल गांधींना याबद्दल सुनावलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पवारांनी मांडलेल्या भूमिकेला विरोधी पक्षातील काही नेत्यांनी समर्थन दिलं.

ADVERTISEMENT

सावरकर मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापू लागलं आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून एकीकडे उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना भाजप-शिवसेनेने राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणाही केली. दरम्यान, याच मुद्द्यावर दिल्लीत झालेल्या बैठकीत शरद पवारांनी भाष्य केले.

विरोधी पक्षाच्या बैठकीत शरद पवार सावरकर मुद्द्यावर काय बोलले?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सावरकरांबद्दल सुरू असलेल्या वादावर भूमिका मांडली. शरद पवार म्हणाले, “सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही. सावरकर माफीवीर म्हणणं योग्य नाही.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा – भाजप-शिवसेना काढणार ‘सावरकर गौरव यात्रा’; कसं असणार स्वरुप?

पुढे बोलताना पवार म्हणाले, “सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्द्यावर चर्चा करूयात.” शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेला अनेक खासदारांनी सहमती दर्शवली.

संजय राऊतांनी दिला दुजोरा

शरद पवार विरोधी पक्षाच्या बैठकीत सावरकर मुद्द्यावर बोलल्याच्या वृत्ताला खासदार संजय राऊत यांनीही दुजोरा दिला आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “आज कदाचित माझं राहुल गांधींसोबत बोलणं होईल. शरद पवारांनी त्या बैठकीत सावरकर काय होते? त्यांची भूमिका काय होती, यावर परखड भाष्य करून सावरकर हा आघाडीतील वादाचा विषय ठरू नये. ते एक स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक होते, हे मान्य केलं पाहिजे. त्यांची इतर सामाजिक अंगे समजून घेतली पाहिजे, हे काल शरद पवारांनी सांगितलं. तिथे असलेल्या बहुतेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांचं समर्थन केले”, असं संजय राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

हेही वाचा – ‘सावरकरांच्या आडून अडाणी गौरव यात्रा’, संजय राऊत शिंदेंसह भाजपवर बरसले

सावरकर मुद्द्यावर तोडगा निघणार, राऊतांचं महत्त्वाचं भाष्य

दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या विधानामुळे सर्वाधिक अडचण उद्धव ठाकरेंची झाली आहे. भाजप-शिवसेनेला आयती संधी मिळाली असून, आता ठाकरे गटाकडून काँग्रेस नेत्यांशी चर्चा सुरू आहे. याच मुद्द्यासंदर्भात आता संजय राऊत राहुल गांधी यांच्याशी बोलणार आहे. चर्चा करू आणि मार्ग निघेल, असं राऊतांनी म्हटलं आहे. मात्र, यावर राहुल गांधी काय भूमिका मांडणार हे महत्त्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT