‘Devendra Fadnavis फडतूस गृहमंत्री’ : उद्धव ठाकरेंचा चढला पारा; थेट राजीनाम्याची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

shivsena (ubt), shiv sena, uddhav thackeray, devendra fadnavis
shivsena (ubt), shiv sena, uddhav thackeray, devendra fadnavis
social share
google news

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी युवासेनेच्या कार्यकर्त्या रोशनी दीपक शिंदे (Roshani Deepak Shinde) यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. रोशनी शिंदे यांना काल (सोमवारी) शिवसेनेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून ठाकरे कुटुंबियांनी आज रोशनी शिंदे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तालय गाठलं. (Shiv Sena (UBT) party chief Uddhav Thackeray, Rashmi Thackeray and Aditya Thackeray visited Yuva Sena activist Roshni Deepak Shinde at the hospital)

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं. ते म्हणाले, गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारला नपुंसक म्हटल्याचं ऐकलं. त्याची प्रचिती काल आली आहे. ठाण्याची ओळख कालपर्यंत जीवाला जीव देणार, सुसंस्कृत आणि सुशिक्षीत शहर म्हणून होती. पण आता ही ओळख पुसून गुंडांचं ठाणं अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

हेही वाचा : Uddhav Thackeray ठाण्यात; थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली शिवसेनेच्या वाघिणीची भेट

आज पर्यंत मी गँग हा शब्द ऐकत होतो. पण आता महिलांची गँग तयार झाली आहे. महिला गुंडगिरी करायला लागल्या तर आपल्या देशाचं, राज्याचं, ठाण्यचं काय होणार हा प्रश्न आहे. हो गुंड महिलाच म्हणतो मी आणि महिला गुंडांकरवी हल्ला करणारे नपुंसकच म्हटले पाहिजे. जर शिवसैनिक रस्त्यावर उतरला तर आता म्हटलं तर आम्ही यांची गुंडगिरी ठाण्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून फेकून देऊ शकतो. हे तोतये शिवसैनिक जे बाळासाहेबांचे फोटो घेऊन नाचत आहेत, त्यांना हातामध्ये भगवा आणि बाळासाहेबांचा फोटो घेण्याचा अधिकार नाही.

हे वाचलं का?

आता आयुक्तांच्या कार्यालयात गेलो पण ते तिथे उपस्थित नव्हते. ते सरकारचा भाग म्हणून त्याचाप्रमाणे आयुक्त वागत आहेत की काय याची मला कल्पना नाही. पण अजूनही तक्रार दाखल करुन घेतलेली नाही. तिने नाव दिलेली आहेत. ती सांगत होती पोटात मारु नका, लांबून बोला, मातृत्वासाठीचे उपचार सुरु आहेत. पण तरीही तिच्या पोटात लाथा मारण्यात आल्या. हे अत्यंत निघृण काम करणारी माणसं महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीची नाहीत.

हेही वाचा : Thane : ठाकरे गटातील महिलेला शिंदे गटाकडून मारहाण; वादाचं कारण आलं समोर

फडतूस गृहमंत्री अन् लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री :

एक फडतूस गृहमंत्री, अत्यंत लाचार आणि लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे. पद मिळालं म्हणून फडणवीसी करणारा माणूस उपमुख्यमंत्री म्हणून मिरवतं आहे. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवरती या मिंधे गटाच्या आमदारांनी हल्ला केला तरी ते कुठेही हालायला तयार नाहीत. मला असं वाटतं फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही आलं तर लगेच एसआयटी लावायची. शेजारच्या राज्यातून अटक करायची. त्यांच्या पक्षातील लोकांवर हल्ले झाले तर मिंधे गटाकडून झाले तर तिकडे ही फडणवीसी दाखवण्याची हिंमत नाही.

ADVERTISEMENT

ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. बिनकामाचा आयुक्तांनाही मला सांगायचं आहे की पदभार स्विकारताना तुम्ही जी शपथ घेतली त्याच्याशी ही प्रतारणा आहे. त्यांना हटवावं आणि एक कणखर आयुक्त ठाण्यात द्यावे. जर गृहमंत्री खरंच लाळघोटेपणा करत नसतील तर, जराही लाज, लज्जा शरम असेल, हिंमत असेल तर ताबडतोब एक तर पोलीस आयुक्तांना निलंबित करा किंवा त्यांची बदली करा.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT