Eknath Shinde:”आनंद दिघेंविषयी घडलेल्या घटनांचा साक्षीदार, मी बोलेन तेव्हा भूकंप होईल”
ठाण्यातले शिवसेनेचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले आनंद दिघे यांच्याबाबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. योग्य वेळ आल्यावर मी बोलणार आहे. जेव्हा माझी मुलाखत होईल तेव्हा राज्यात भूकंप होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मालेगावातल्या सभेत केलं आहे. ‘धर्मवीर’मधल्या नथुराम गोडसेचा कात्री लावलेल्या सीनसह काय होते एकनाथ शिंदेंच्या बंडाचे संकेत? नेमकं काय […]
ADVERTISEMENT
ठाण्यातले शिवसेनेचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले आनंद दिघे यांच्याबाबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. योग्य वेळ आल्यावर मी बोलणार आहे. जेव्हा माझी मुलाखत होईल तेव्हा राज्यात भूकंप होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मालेगावातल्या सभेत केलं आहे.
ADVERTISEMENT
‘धर्मवीर’मधल्या नथुराम गोडसेचा कात्री लावलेल्या सीनसह काय होते एकनाथ शिंदेंच्या बंडाचे संकेत?
नेमकं काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघेंबाबत?
“आम्ही दोघंही धर्मवीर या आनंद दिघेंवर आधारित असलेल्या सिनेमांत आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत आम्ही कामही केलं आहे. दिघेसाहेबांना सगळा महाराष्ट्र ओळखतो. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार तळागाळात पोहचवण्याचं काम आनंद दिघे यांनी केलं. त्यासाठी रात्रीचा दिवस केला. पायाला भिंगरी लावून त्या माणसाने शिवसेना वाढवली. शहरी भाग, आदिवासी वस्त्या, पाडे या ठिकाणी शिवसेना पोहचवली.” असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत.
‘धर्मवीर’ सिनेमा ठरला ठाकरे-शिंदेच्या संघर्षाचं कारण?
“आनंद दिघेंनी वयाची ५० वर्षेही पूर्ण केली नव्हती तेव्हा त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना माझ्या आयुष्यातलीही दुःखद घटना आहे. एका दिवसात दोन दिवसाचं काम करणारे आनंद दिघे होते. याचा साक्षीदार मी तर आहेच पण माझ्यासारखे अनेक लोक आहेत. शिवसेना आणि ठाणे म्हटलं की आनंद दिघे यांचं काम समोर यायचं. बाळासाहेब ठाकरेंनाही हेवा वाटावा असं काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केलं.”
ADVERTISEMENT
धर्मवीर सिनेमाही काही लोकांना आवडला नाही, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
“धर्मवीर आनंद दिघे यांचं कार्य लोकांपर्यंत पोहचावं म्हणून तो प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून केला. या महाराष्ट्रात आनंद दिघे यांच्या आयुष्यावरचा सिनेमा भरभरून चालला. रेकॉर्डब्रेक सिनेमा झाला. या सिनेमाला १६ बक्षीसं मिळाली. मात्र काही लोकांना हा सिनेमा रूचला नाही, पटलं नाही. कारण धर्मवीरांचं कार्य आम्ही लोकापर्यंत पोहचवलं. मी आज जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही. पण जेव्हा योग्य वेळी बोलेन आणि आत्ता जो मुलाखतींचा सपाटा सुरू आहे त्याबाबत ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यादिवशी या राज्यात आणि देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही.” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
आम्ही बंडखोरी, गद्दारी केलेली नाही
आम्ही कुठलीही बंडखोरी किंवा गद्दारी केलेली नाही. आम्ही क्रांती घडवली. जो अन्याय होत होता त्याविरोधात आम्ही क्रांती केली. याची दखल फक्त महाराष्ट्राने नाही तर जगातल्या ३३ देशांनी याची दखल घेतली. तरीही आमच्या माथी गद्दारांचा शिक्का लावला गेला. एवढा मोठा उठाव का झाला याचं मूळ शोधलं पाहिजे.. मात्र तसं झालेलं नाही. आमच्यावर शिक्के मारले जात आहेत मात्र जनतेने आम्हाला स्वीकारलं आहे असंही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मालेगावमधल्या सभेत म्हटलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT