‘राजकीय स्वार्थासाठी दंगली…’,’सामना’तून अमित शाहांवर टीकास्त्र
Shivsena Saamana Editoril criticize Amit Shah : धार्मिक वाद,दंगलींचे भूत उरकून काढायचे आणि मतांचे धृवीकरण करीत स्वत:चा राजकीय स्वार्थ साधायचा, असा नेहमीचा खेळ भाजपाने कर्नाटकात सुरु केल्याची टीका सामना अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली आहे
ADVERTISEMENT
Shivsena Saamana Editorial criticize Amit Shah : धार्मिक वाद,दंगलींचे भूत उरकून काढायचे आणि मतांचे धृवीकरण करीत स्वत:चा राजकीय स्वार्थ साधायचा, असा नेहमीचा खेळ भाजपाने कर्नाटकात सुरु केल्याची टीका सामना अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या कर्नाटकातील व्यक्तव्याचा देखील सामनातून समाचार घेण्यात आला आहे. (shivsena saamana editoril criticize amit shah on karnataka election 2023)
ADVERTISEMENT
सामना अग्रलेखातून भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर (Amit Shah) चौफेर टीका करण्यात आली आहे. गाईचा मुद्दा असो,दुहेरी नागरिकत्व कायद्याचा असो, रामजन्मभूमी किंवा रामनवमी-हनुमान जयंतीचा असो, लव्ह जिहाद किंवा लॅंड जिहादचा असो किंवा हिजाब बंदीचा असोत, या प्रत्येक मुद्दयावरून दंगली भडकविण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा गंभीर आरोपवर भाजपवर सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.
हे ही वाचा : ‘आता भाकरी फिरवायची वेळ…’, शरद पवारांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
कर्नाटकात बोम्मई सरकारचे जाजम जनता खेचून घेणार याची जाणीव भाजपला झाल्यानेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुन्हा एखादा दंगलीचे इशारे-नगारे वाजविले असल्याची टीका सामनातून अमित शाह (Amit Shah) यांच्यावर करण्यात आली आहे. तसेच कर्नाटकातील जनता हा नगारा फोडेल आणि भाजपच्या राजकारणाचा भंडाफोड करेल, असे भाकित देखील वर्तवण्यात आले आहे.
हे वाचलं का?
कर्नाटकात कॉग्रेस पक्ष सत्तेत आला तर राज्यात घराणेशाहीचे राजकारण आणि दंगलीमध्ये राज्य होरपळून निघेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रचारात केला होता. अमित शाह यांचा हाच दावा सामनातून शिवसेनेने खोडून काढलाय. केंद्रीय गृहमंत्र्यांना कानडी जनतेला दंगलींची भिती दाखवावीशी का वाटली? असा सवालच अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला. कर्नाटकात भाजप सरकार असताना, बोम्मई सरकारच्या 5 वर्षाच्या कारभाराचा दाखला देऊन मते मागितली पाहिजे होती.मात्र त्याऐवजी अमित शाहांनी जातीय दंगलींचे भूत नाचवल्याची टीका करण्यात आली आहे.
हे ही वाचा : मनसे कोणाला टाळी देणार? अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा बाऊन्सर
धार्मिक वाद,दंगलींचे भूत उरकून काढायचे आणि मतांचे धृवीकरण करीत स्वत:चा राजकीय स्वार्थ साधायचा, हा नेहमीचा खेळ भाजपाने कर्नाटकात सुरू केला आहे. पराभव दिसू लागला की भाजप हाच फंडा वापरत असल्याची टीका देखील सामनातून (Saamana Editorial) करण्यात आली. जातीय, धार्मिक विद्वेष पसरवायचा आणि राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजायच्या, धार्मिक मुद्यांचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसवायचे, जनतेला हिंदू-मुस्लिम वादाच्या गुंगीत ठेवून सत्ता साधायची हेच या मंडळींचे राजकारण असल्याची टीका देखील भाजपवर (BJP) करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT