‘..तर मी विकेट घेणारच ना’, पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचे गौप्यस्फोट; फडणवीसांना टोले
Latest Political News Maharashtra: मला गुगली कशी टाकायची हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळे समोरून विकेट दिली तर घेणारच ना.. असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT
Latest Political News Maharashtra: पुणे: पहाटेच्या शपथविधीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘पवारांनी आमच्यासोबत डबलगेम केला.’ असं फडणवीस एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हणाले होते. ज्यानंतर आज (29 जून) पुण्यात एक पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी फडणवीसांना पुरतं खिंडीत गाठलं. ‘जर विकेट दिली तर आम्ही का घ्यायची नाही?, खरं तर त्यांना सत्तेशिवया करमत नव्हतं, अस्वस्थ होते.. गुगली कशी टाकायची हे मला माहिती आहे.’ असं टोला पवारांनी यावेळी हाणला. तसंच देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी काहीही करु शकतात अशी टीकाही पवारांनी केली.
ADVERTISEMENT
शरद पवारांची पत्रकार परिषदेत तुफान फटकेबाजी
‘मी निर्णय बदलला होता तर फडणवीसांनी शपथच का घेतली होती?’
‘देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमची बैठक झाली… आणि दोन दिवसांनी त्यांनी आपली भूमिका बदलली.. समजा, बैठक झाली आणि भूमिका बदलली.. बैठक झाली काय.. मी जाहीरच बोललो होतो. मी जाहीर हे बोललो होतो की, तुम्हाला सरकार बनवायला लोकं कमी पडत असतील तर राष्ट्रवादी तुम्हाला बाहेरुन पाठिंबा देईल. पहिल्यांदा निवडणूक झाल्यानंतर त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका मी घेतील, ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले. नंतर पाठिंबा द्यायची वेळ आली नाही.’
‘तो पाठिंबा देण्यामागे आमचं काही कारण होतं. त्यांच्याबद्दल फार कौतुक होतं असं नाही. पण दुसऱ्या काही गोष्टी होत्या.. त्यांच्यात मित्रांमध्ये कसं अंतर पडेल याची आम्हाला काळजी घ्यायची होती. तो त्या काळचा प्रश्न होता.’
हे वाचलं का?
हे ही वाचा>> ‘एकनाथ शिंदे माझे ‘बॉस’, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 2024 मध्ये मुख्यमंत्री कोण ठरवणार?
‘यानंतरच्या काळाबाबत त्यांनी जे सांगितलं की, ते भेटले ही गोष्ट खरी आहे.. अनेक गोष्टींची चर्चा केली हे खरं आहे.. पण त्यांनी (फडणवीस) स्वत:च सांगितलं काल.. की, या संबंधीचं धोरण मी बदललं काल. 2 दिवस आधी. जर मी दोन दिवसांआधी धोरण बदललं होतं तर त्यानंतरच्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं?’ असा खडा सवाल शरद पवारांनी फडणवीसांना केला आहे.
‘पाठिंबा होता तर शपथ चोरून का घेतली?’
‘ती शपथ घ्यायची होती तर.. ती अशी चोरून का घेतली पहाटे? त्यांना जर शपथ घ्यायची होती आणि त्यांना पाठिंब्याची जर खात्री होती.. ती शपथ घेतली आणि त्यानंतर जर आम्हा लोकांचा त्यांना पाठिंबा होता तर दोन दिवसात ते सरकार राहिलं का तिथे?’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
‘दोन दिवसात त्यांची सत्ता गेली.. त्यांना त्यांचा राजीनामा द्यायला लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे की, सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो ही जी त्यांची पावलं होती. ती पावलं एकदा समाजाच्यासमोर यावीत या दृष्टीने काही गोष्टी केलेल्या होत्या’ असा घणाघाती प्रहारही पवारांनी यावेळी केला.
‘फडणवीस फसेलच का?’, पवारांचा बोचरा सवाल
‘अरे.. ते फसले का?.. फसले का? उद्या मी सांगितलं तुम्हाला राज्यपाल करतो.. या शपथ घ्यायला. लगेच शपथ घ्यायला याल का? यात मोदींचा संबंधच नव्हता… सत्तेशिवाय करमत नव्हतं ते मोदी नव्हते. ते राज्यातले होते..’
‘भेटा-भेटी असे भेटले होते. मी याआधीही सांगितलं होतं आणि अनेकदा भेटतात.. आजही भेटतो.. पण याचा अर्थ या गोष्टी नसतात. पण आम्ही यासाठी किती अस्वस्थ आहोत. त्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. जगू शकत नाही. ही त्यांची अस्वस्थतता.. एकदा महाराष्ट्राच्या समोर येण्याची आवश्यकता होती.’ अशा शब्दात शरद पवारांनी फडणवीसांचा समाचार घेतला.
‘गुगली कसा टाकायचा ते माहितेय, विकेट दिली तर घेणारच ना…’
‘असं आहे की, चर्चा सगळ्या झाल्या… काही करुन त्यांना आमची मदत हवी असेल तर काय आहे.. कसली मदत.. कशासाठी? काय लाइन.. या सगळ्या गोष्टी बोलल्याशिवाय कोणी चर्चा करतं काय?’
‘तीन ते चार दिवसांआधी मी माघारी आलो असं ते म्हणतात याचा अर्थ तीन दिवस माघारी आलो तर त्यांनी शपथ का घेतली? यातून अर्थ काय काढायचा तो काढा..’
हे ही वाचा>> शरद पवारांनी डाव टाकला, देवेंद्र फडणवीस-अजित पवार सापडले ‘ट्रॅप’मध्ये?
‘असं आहे की, हा डाव होता की काय होता मला माहिती नाही… पण माझे सासरे होते त्यांचे नाव सदू शिंदे.. जे देशातील उत्तम गुगली बॉलर होते. या गुगली बॉलरने मोठ्या मोठ्या लोकांच्या विकेट्स घेतल्या होत्या आणि मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठे टाकायचा.. मी जरी खेळलो नसलो तरी माहित होतं. यापेक्षा जास्त काही विचारू नका. आता विकेट दिली.. तर करायचं काय? ती विकेट घेतलीच पाहिजे. ते काही म्हणतील आता.. ते त्यांची विकेट गेलीए हे सांगतायेत का?’
‘देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी काय करू शकतात.. कुठे जाऊ शकतात.. कितवर जाऊ शकतात.. या सगळ्यासंबंधीची ही स्थिती आहे.’ असं म्हणत शरद पवारांनी खास शैलीत फडणवीसांवर एकापाठोपाठ एक असे टीकेचे बाण सोडले.
आता शरद पवारांच्या या प्रत्युत्तरानंतर देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार आणि पवारांवर पुन्हा प्रतिहल्ला चढवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT