Aaditya Thackeray : मारकडवाडीचा मुद्दा पेटणार? आमदारांनी शपथच घेतली नाही, आदित्य ठाकरे म्हणाले आता राज्यभर...

सुधीर काकडे

जवळपास 173 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये बहुतांश सत्ताधारी आमदारांचा समावेश आहे. मात्र विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज शपथ घेतली नाही. याबद्दल आदित्य ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मारकडवाडीचा मुद्दा पेटणार...

point

विरोधी पक्षातील आमदारांनी शपथच घेतली नाही

point

आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Aaditya Thackeray on MLA Oath Taking : राज्याच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आज सुरूवात झाली. नुकतंच महायुतीचं सरकार स्थापन झालं असून, या सरकारमध्ये सहभागी असलेल्या महायुतीच्या आमदारांनी आज शपथ घेतली. जवळपास 173 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये बहुतांश सत्ताधारी आमदारांचा समावेश आहे. मात्र विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज शपथ घेतली नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी EVM शी संबंधीत गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केल्या जात होता, त्याचाच निषेध करण्यासाठी आज आमदारांनी शपथ घेणं टाळलं आहे. लोकशाहीचा खून होतोय आणि आम्ही त्याचा निषेध करतोय असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. 

हे ही वाचा >> Aaditya Thackeray meets Devendra Fadnavis : आदित्य ठाकरेंनी फडणवीसांशी हात मिळवला, पण गुलाबरावांना इग्नोर...

महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानसभेत शपथ घेतली नाही. निवडणूक आयोग आणि सरकारच्या हातून लोकशाहीच्या खुनाचा हा आमचा निषेध आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. एक्स खात्यावर पोस्ट करत आदित्य म्हणाले,  मारकडवाडीमध्ये मतपत्रिकेद्वारे मॉक पोलची करण्याची तयारी गावकऱ्यांनी केली होती, मात्र  लोकशाहीसाठी लढणाऱ्या या गावात प्रशासनाने संचारबंदी लागू केली. याचा सत्तास्थापनेवर काहीही परिणाम झाला नसता, पण सत्य समोर आलं असतं. मात्र, लोकशाही असूनही मारकडवाडीच्या नागरिकांना ते करण्यापासून रोखण्यात आलं. तसंच तिथल्या काही गावकऱ्यांना काही लोकांना अटक केल्याचंही समोर आलं आहे. 

 

हे ही वाचा >> Vinod Kambli : विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली, पण कपिल देव म्हणाले..

आदित्य ठाकरे म्हणाले, ही लोकशाहीची थट्टा आहे आणि सरकार घाबरत असल्याचं उघड झालं आहे. सत्य जगासमोर येऊ नये यासाठी सत्ताधारी निवडणूक आयोगाचा वापर करत आहेत. आम्ही आमच्या लोकशाहीतील हक्कांसाठी लढू. आम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे. आम्ही निवडून आलेले आहोत, तरीही ईव्हीएमबाबत लोकांच्या शंका दूर करू. कारण हा जनादेश निवडणूक आयोगाचा आणि ईव्हीएमचा आहे, महाराष्ट्राचा नाही. "होऊ द्या संपूर्ण महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर मॉक पोल" असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आवाहनही केलं आहे.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp