India Today Conclave : 'मुंबई'च्या 'तुंबई'वरून ठाकरेंनी CM शिंदेंना घेरलं, ''थिएटर नाही जाऊन पिक्चर बघायला...''

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

aditya thackeray criticize eknath shinde government on mumbai rain shiv sena ubt maharashtra politics
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इतकं भयानक चित्र मुंबईने कधी पाहिलं नाही

point

अडीच वर्षे झाली पण रस्त्याचे अर्धा किलामीटरही काम झालेले नाही

point

शिंदेंची एक टोळी आहे

Aditya Thackeray On Cm Eknath Shinde : मुंबईत बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले होते. रेल्वे प्रवाशांचे मेगा हाल झाले होतेच, त्याचसोबत रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही मोठी पंचाईत झाली होती.याच मुद्यावरून आता आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. घटनाबाह्य राजवटीतल्या मंत्र्यांना वाटतं डीझास्टर मॅनेजमेंटच्या कंट्रोल रूममध्ये जाऊन फोटो काढल्यानंतर सगळं आटोक्यात येईल. पण ते काय थिएटर नाही पिक्चर बघण्यासाठी, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेवर टीका केली आहे. ( aditya thackeray criticize eknath shinde government on mumbai rain shiv sena ubt maharashtra politics) 

बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची काल तुंबई झाली होती. त्यामुळे मुंबईकरांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागला होता. यावरूनच आज आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर हल्ला चढवला. ''घटनाबाह्य राजवटीतले जे मंत्री आहेत, त्यांना अस वाटतं की तिथे (कंट्रोल रूम) गेल्यावर फोटो काढल्यानंतर सगळ आटोक्यात येईल. पण ते काय थिएटर नाही जाऊन पिक्चर बघायला, अरे वा इथे पाणी तुंबलय, तिथे पाणी तुंबलय. ती डिझास्टर कंट्रोल रूम आहे. जिकडे अधिकाऱ्यांना कळतं आपल्याला तिकडे काय उपाययोजना करता येईल.  पण काल एकही अधिकारी रस्त्यावर दिसला नाही, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. 

हे ही वाचा : Sanjay Raut: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! संजय राऊत पुन्हा तुरुंगात जाणार? नेमकं प्रकरण काय?

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले,  कालच एका (इंडिया टूडे) कॉनक्लेवमध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं होतं, पुढच्या 1-2 वर्षा मुंबई खड्डेमुक्त करणार, पण अडीच वर्षे झाली घटनाबाह्य सरकारला. सगळीकडे रस्ते खोदून ठेवले आहेत, पण रस्त्याचे अर्धा किलामीटरही काम झालेले नाही, असा हल्ला ठाकरेंनी शिंदेवर चढवला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका झाल्या नाहीयेत. त्यामुळे हा सगळा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून घटनाबाह्य मुख्यमंत्री नगरविकास खांत आपल्याजवळ ठेवून चालवत आहेत. शिंदेंची एक टोळी आहे. या टोळीत काँन्ट्रॅक्ट वाटले जातात.  पण हे काँन्ट्रॅक्ट वाटून देखील कुठे काम झालेले नाही. त्यामुळे इतके अकार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नाही, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. 

हे ही वाचा : Mumbai Rains: मुंबईत धो धो बरसला! कुठे कुठे दैना झाली? पाहा सर्व Video एका क्लिकवर

मुंबई, पुणे आणि ठाण्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही आहे. आम्ही हिंदमाताचं जे काम केले होते. ते  काम चालू असायला पाहिजे होतं. काल तिथे पाणी भरायला पाहिजे नव्हतं.मुंबईत अनेक ठिकाणी आम्ही पंप बसवले आहेत. काल तुम्हाला एक तरी अधिकारी रस्त्यावर दिसला का? पंप चालू आहे की नाही ते पाहायला? असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT