Amol kolhe : अजित पवार खासदार कोल्हे यांचा करणार ‘विजय शिवतारे’, 2019 ची पुनरावृत्ती होणार…
अजितदादांनी अमोल कोल्हेंना पाडण्याचे चँलेज दिल्यानंतर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी खासदारकी लढवण्याची इच्छा जाहीर केली. आता अजितदादांनी संधी दिल्यास खासदारकी लढणार असल्याचे विलास लांडे यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे नेते आणि उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटाचा खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांचा लोकसभा निवडणूकीत पराभूत करण्याचा निर्धार केला आहे. शिरूर येथील उमेदवार पाडणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले आहे. अजितदादांनी एकदा एखाद्या उमेदवाराला पाडण्याचा निर्णय घेतला की, ते निवडणूकीत पाडूनच राहतात. याचा महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा इतिहास आहे.कारण याआधी पवारांनी शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांना बोलून निवडणूकीत पाडले आहेत. त्यामुळे आता अमोल कोल्हेंचा विजय शिवतारे होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (ajit pawat challenge to defeat amol kolhe shirur lok sabha constituency vijay shivtare vilas lande ncp politics)
ADVERTISEMENT
विजय शिवतारेंचा निवडणूकीत पराभव
आधी राष्ट्रवादीत असलेले आणि नंतर शिवसेनेत गेलेले विजय शिवतारे यांना अजित पवारांनी बोलून निवडणूकीत पाडले होते. त्याचं झालं असं की विजय शिवतारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर टीका करायला सुरूवात केली होती. त्यानंतर अजित पवारांनी शिवतारेंविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली. अजितदादांनी थेट सभेतून शिवतारेंना चँलेज दिले होते.,’तुला यंदा दाखवतो तु कसा आमदार होतो ते’. ‘अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय.’ ‘मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही.’ त्यानंतर झालेल्या 2019 च्या निवडणूकीत अजितदादांनी चँलेंज जिंकलं आणि विजय शिवतारेंना पाडलं होतं.
हे ही वाचा : Opinion Poll 2024 : शिंदे-पवारांची साथ… भाजपवरच ‘बुमरँग’! ओपिनियन पोलचा अर्थ काय?
कोल्हेंना थेट चँलेंज
आता विजय शिवतारेंसारखाच आक्रमक पावित्रा अजितदादांनी खासदार अमोल कोल्हेंविरोधात घेतला आहे. पाच वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं नाही. त्याला निवडून आणण्यासाठी मी जीवाचे रान केले. पण आता शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार आणि तिथे असलेला उमेदवार निवडून आणणार असे अजित पवार यांनी सांगितले आहे.त्यामुळे अजित पवारांनी आता थेट अमोल कोल्हेंना पाडण्याचे चँलेज घेतले आहे. तसेच ज्यावेळेस अजित पवार एखादे चॅलेंज देतो, त्यावेळेस जिंकूनच दाखवतो. निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल,असे सूचक विधान देखील अजित पवार यांनी केले आहे.
हे वाचलं का?
अजितदादांच्या चँलेजवर कोल्हे म्हणाले…
अजित पवार फार मोठे नेते आहेत त्यांच्यावर मी काय बोलणार?.ते कायम मार्गदर्शक ठरलेत मात्र पालक मंत्री असताना त्यांनी मतदार संघात जास्तीचा निधी दिला असता तर विकास कामे जास्त झाली असती अशा शब्दात डॉ अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर टीका केली. दादांनी आता भूमिका बदलली मी मात्र भूमिका बदलली नाही.काही खाजगी गोष्टी विश्वासाने सांगितल्या जातात.याबत अलिखित संकेत असतो.मात्र अशा गोष्टी मांडायच्या असतील तर सगळ्याच मांडाव्या लागतील, असे देखील अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Arbaaz Khan-Shura Khan Lovestory : ‘लागलं सजनीला सजनाच याड’, अरबाज-शूरा कसे पडले प्रेमात?
दरम्यान अजितदादांनी अमोल कोल्हेंना पाडण्याचे चँलेज दिल्यानंतर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी खासदारकी लढवण्याची इच्छा जाहीर केली. आता अजितदादांनी संधी दिल्यास खासदारकी लढणार असल्याचे विलास लांडे यांनी म्हटले आहे. दरम्यान आता अजितदादांनी थेट निवडणूकीत पाडण्याच चँलेज दिल्याने आता अमोल कोल्हेचा विजय शिवतारे होतो का? हे आगामी निवडणूकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT