Ajit Pawar: सुप्रिया सुळेंना राखी बांधणार का? अजितदादांनी दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar vs Supriya Sule
Ajit Pawar vs Supriya Sule
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुप्रिया सुळेंबाबत अजित पवारांचं मोठं विधान

Ajit Pawar On Supriya Sule: महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून महाविकास आघाडीचे नेते सत्ताधाऱ्यांवर टीका-टीप्पणी करत आहेत. अशातच रक्षाबंधनाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातही पवार कुटुंबीयांच्या नातेसंबंधांबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील नात्यात दुरावा निर्माण झाला आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने अजितदादा सुप्रियाताईंना राखी बांधणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. अजितदादा तुम्ही सुप्रिया सुळे यांना राखी बांधणार का? असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. यावर अजितदादांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?

सुप्रिया सुळे यांना राखी बांधण्याविषयी अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. इतर ठिकाणी मी माझ्या सर्व बहिणींना भेटणार आहे. जिथे मी आहे, तिथे सुप्रिया सुळेही असतील, तर मी त्यांना भेटेल. जय पवार यांच्या विधानसभेच्या उमेदवारीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्या मुलाच्या जयच्या उमेदवारीबाबत आमचा पक्ष निर्णय घेईल. विधानसभेत जय निवडणूक लढवणार की नाही, हे आमच्या पक्षाकडून ठरवलं जाईल.

हे ही वाचा >> Maharashtra Weather: वादळ, सोसाट्याचा वारा... हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

"मी सात-आठ वेळा निवडणुका लढवल्या आहेत, पण..."

निवडणूक लढवण्यात आता फारसा रस राहिला नाही, असंही अजित पवार म्हणाले होते. यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, अजितदादा आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं नाही. त्यांनी फक्त त्यांच मत व्यक्त केलं आहे. 
जय पवारांनी विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरावं, असं त्यांचे समर्थक म्हणतात. यावर अजित पवार म्हणाले, ही लोकशाही आहे. मला निवडणूक लढण्यात रस नाहीय. मी सात-आठ वेळा निवडणुका लढवल्या आहेत. जर लोकांना आणि समर्थकांना असं वाटत असेल, तर संसदीय बोर्ड याबाबत चर्चा करेल. 

हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : अजित पवारांच्या जुन्नरमधील कार्यक्रमला काळे झेंडे दाखवत भाजपचा विरोध!

ADVERTISEMENT

पार्थ पवारांचा २०१९ मध्ये झाला होता पराभव

अजित पवार यांचा थोरला मुलगा पार्थ पवार यांनी २०१९ मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु, या निवडणुकीत त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता.अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना या लोकसभा मतदारसंघात निवडून आणण्यासाठी कंबर कसली. बारामतीत झालेल्या पवार विरुद्ध पवार लढतीची दिल्लीतही चर्चा रंगली.

ADVERTISEMENT

अशातच आता विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांत होऊ घातली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार तर राष्ट्रवादीकडून जय पवार उभे राहणार असल्याचं संकेत मिळत आहेत. या दोन्ही उमेदवारांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केल्यास, बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांमध्ये राजकीय रणधुमाळी पाहायला मिळेल. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT