"2029 ला देशाच्या पंतप्रधानपदी...", देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis: नरेंद्र मोदी यांचं वय सध्या 74 आहे. भाजपमध्ये एक अलिखित नियम असल्याचं म्हटलं जातं. ज्यानुसार 75 व्या वर्षी नेते सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारतात. त्यामुळे सध्या त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पंतप्रधान मोदींच्या वयामुळे सुरूय उत्तराधिकाऱ्याची चर्चा

देवेंद्र फडणवीस उत्तराधिकाऱ्यामुळे काय म्हणाले?

कोण असणार 2029 ला भारताचे पंतप्रधान?
Devendra Fadnavis : 2024 च्या लोकसभा निवडणुका पार पडल्यापासूनच देशाच्या 2029 साली पंतप्रधान कोण होणार याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे. फडणवीस म्हणाले की, मोदींच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दल चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 2029 मध्येही मोदी पंतप्रधान होतील असा दावा त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस बीकेसीमधील इंडिया ग्लोबल फोरम कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, 2029 मध्ये मोदी पंतप्रधान होणार असल्यानं, पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल विचार करण्याची ही योग्य वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांसारख्या दिग्गजांच्या प्रयत्नांमुळेच भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष होऊ शकला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा >> Maharashtra Weather : कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामान! कोणत्या भागात पावसाच्या सरी कोसळणार?
भाजपच्या कार्यालयासाठी 5 लाख रुपये...
त्यापूर्वी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये भाजपच्या नवीन कार्यालयाची पायाभरणी केल्यानंतर फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, आपल्याच घराची पायाभरणी होत आहे असे वाटतंय. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रयत्नांमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नवीन भाजप कार्यालयासाठी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य केलं आहे. तसंच त्यांनी सर्व पक्ष कार्यकर्त्यांनाही त्यांच्या क्षमतेनुसार योगदान देण्याची विनंती केली.
हे ही वाचा >> केदार जाधव आहे तरी कोण... नेमका इतिहास काय, भाजपमध्येच का केला प्रवेश?
पंतप्रधान मोदींचं वय...
दरम्यान, नरेंद्र मोदी यांचं वय सध्या 74 आहे. भारतीय जनता पक्षात (भाजप) एक अलिखित नियम असल्याचं म्हटलं जातं. ज्यानुसार 75 व्या वर्षी नेते सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारतात. यामुळे 2025 नंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी बोलतानाही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहतील असं सांगितलं आहे.