“तुझ्यासारख्या गिधाडाला…”; जितेंद्र आव्हाड-चित्रा वाघ यांच्यात ‘राजकीय दंगल’
सोशल मीडियावर औरंगजेबाबद्दल पोस्ट टाकल्याची झळ कोल्हापूरला बसली. दगडफेक, लाठीचार्ज, अश्रुधुरांचे नळकाडे आणि शहरात दंगल झाली. सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात ‘ट्विट’वार रंगलं.
ADVERTISEMENT
Aurangzeb post kolhapur : सोशल मीडियावर औरंगजेबाबद्दल पोस्ट टाकल्याची झळ कोल्हापूरला बसली. दगडफेक, लाठीचार्ज, अश्रुधुरांचे नळकाडे आणि शहरात दंगल झाली. या दंगलीची कारणमीमांसा सुरू असताना दुसरीकडे राजकीय दंगल बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात ‘ट्विट’वार रंगलं. याची सुरूवात कशी झाली तेच समजून घेऊयात.
ADVERTISEMENT
कोल्हापुरातील दंगलीवरून मविआ नेत्यांकडून टीका झाली. या टिकेला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, “सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली… आजकाल मविआच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की, त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही. पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय. अशा विकृतींना वेळीच आवर घाला आणि यांना येरवड्याच्या रूग्णालयात दाखल करा.”
जितेंद्र आव्हाडांची टीका
“ताई मी कुठलीही शिवी दिली नाही. फक्त मला munmy कुणाची तोंड उघडायला लावू नका. मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे. तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है. हमाम मै सब नंगे है, Baपूआर्मस्ट्राँग. आठवत असेल ना? ह्या पुढे स्वभावाप्रमाणे वागीन एंटी चेम्बरमधले ‘विनोद’ आत्ता बस. आपण खूप खालच्या पातळी वार जाऊन बोलता. माझा स्वभाव आपल्याला माहीत आहे. मी सहन करतो. पण, मला त्यानी बोलावे ज्याचे हात स्वछ आहे. अजून खूप बोलू शकतो. बहिणीला संभाळून घेत आलो, पण…”, असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला.
हे वाचलं का?
चित्रा वाघांचं प्रत्युत्तर
“म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय. तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय.”
हेही वाचा >> Mira Road Murder : मनोज साने आणि सरस्वती वैद्यने केले होते लग्न?
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, “बहीण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्यासारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्दैव आहे. माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता, तेव्हा माझा संघर्ष सुरू होता. परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्महत्या होती की हत्या केली तुम्ही त्याची ही चौकशी व्हायला हवी तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला? हेही लपून राहिलेलं नाही पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील. मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू, तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार”, असा इशाराही चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाडांना दिला.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> “2014 नंतर भाजपसोबत युतीला माझा विरोध होता”, संजय राऊतांचा ‘राजकीय बॉम्ब’
त्या असंही म्हणाल्या की, “खुद को इज्जतदार बोलते हुए इज्जत औरत की उतारते हैं. आपकी तृष्णा कभी तृप्त नहीं होती है, आप रावणकाल के भूखे और लंघे हैं. आप हमाम के बाहर भी नंगे हैं. जितेंद्र आव्हाड, आव्हाड नाहीसच तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे. राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव”, अशा शब्दात चित्रा वाघांनी पलटवार केला.
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“माझा डीएनए जेव्हा तुम्ही काढता चित्राताई, तेव्हा तो माझ्या आईच्या चारित्र्यावर हल्ला असतो. आणि मी पुन्हा निक्षून सांगतो, कळत नकळत जरी माझ्या आईची बदनामी आपण केलीत, तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल”, असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी चित्रा वाघांना दिला.
चित्रा वाघ म्हणाल्या, ‘तुझ्यासारख्या गिधाडाला…’
“माझ्या ट्विटमध्ये म्हंटलय मी औरंग्याची पैदास वाढू लागली, ती ज्यांनी जन्माला घातली त्या महाविकास आघाडीच्या पैदावारांचा आणि औरंगजेबाचा DNA एकच असावा. ही सुरूवात आहे ट्वीटची.. यात तुझ्याच काय कुणाच्याच आईला बोलण्यासारख काय आहे?? राज्यातील परिस्थिती चिघळवण्यात तुझ्यासारखे लांडगे जबाबदार आहेत त्यावरून मी लिहलंय हे तर शेंबड पोर ही सांगेल रे”, असं उत्तर चित्रा वाघांनी दिलं.
त्या पुढे म्हणाल्या, “आणि म्हणे हा आमदार… हा रात्री 12 नंतर आपल्या सोयीने अर्थ लावणार आणि महिलांचं चारित्र्यहनन करणार… ही काही याची पहिली वेळ नाही. आणखी एका महिला नेत्याविषयी रात्री 2/2:30 वाजता गलिच्छ भाषेत याने ट्वीट केलेय. उगाच पदराआडून हल्ले करायची गरज नाही”, असंही चित्रा वाघांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मुंबई Tak चावडी : अटलजींचा फोन, शिवसेनेचे 40-50 खासदार; संजय राऊतांनी सांगितला 1992 चा किस्सा
“तुला काय आणि किती चिखल माझ्यावर उडवतां येईल तो उडव, कारण तुझ्याकडे माझ्यावर चालवायला दुसरं शस्त्र नाही रे. आणि हो… ज्या तालमीत तू शिकलाहेस ना, त्यातच मी ही शिकलीये. तुझ्यासारख्या गिधाडाला मीच पुरून उरेन, हे तू लक्षात ठेव… करारा जवाब मिलेगा”, असा इशारा चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाडांना दिला आहे. आता यावर जितेंद्र आव्हाड काय उत्तर देतात ते बघावं लागेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT