Eknath Shinde : आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

badlapur rape case akshay shinde encounter cm eknath shinde reaction on badlapur school rape case
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अक्षय शिंदेने निलेश मोरेवर फायरिंग केली होती.

point

पोलिसांनी स्वत:च्या बचावासाठी ही कारवाई केली

point

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

Akshay Shinde Encounter, Badlapur Rape Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची घटना घडली आहे. पोलिस व्हॅनमधून जाताना अक्षय शिंदेने बंदूक हिसकावून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या दरम्यान सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर अक्षय शिंदेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनाक्रमावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (badlapur rape case akshay shinde encounter cm eknath shinde reaction on badlapur school rape case)

ADVERTISEMENT

पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी त्याचा तपास करण्यासाठी त्याला आणले जात होते. या दरम्यान अक्षय शिंदेने निलेश मोरेवर फायरिंग केली होती. यावर पोलिसांनी स्वत:च्या बचावासाठी गोळीबार केला आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे,अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हे ही वाचा : Crime Story: स्वप्नात तरूणाकडे मृतदेहाने मागितली मदत अन्... मानवी सापळ्याचे भयानक गूढ!

लहान मुलींवर ज्यावेळी आरोपीने अत्याचार केला, तेव्हा विरोधकांनी फाशीची मागणी केली होती. आता तेच विरोधक आरोपीची बाजू घेत असतील तर हे दुदैव आहे. आणि म्हणून आरोपीची बाजू घेणे निंदाजनक आहे, त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी जो स्वरक्षणासाठी जो गोळीबार केला आहे, त्याचा तपास होईल आणि पुढील कारवाई होईल, असे देखील शिंदे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गृहमंत्री फडणवीस काय म्हणाले? 

अक्षय शिंदे यांच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. त्यासंदर्भात चौकशी करण्याकरता त्यांना नेण्यात येत होते. त्याने यावेळी पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसावर गोळीबार केला आणि हवेत गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी संरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केला आहे, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : Dombivali Crime : तोंडावर उशी ठेऊन लेकीला संपवलं! नंतर आईने केली आत्महत्या, रात्री बाबा घरी येताच..

    follow whatsapp

    ADVERTISEMENT