MOTN 2024 : Shiv Sena-NCP ला सोबत घेऊनही बसणार झटका! भाजपची झोप उडवणारा पोल?
इंडिया टुडे-सी व्होटर सर्वे झोप उडवताना दिसत आहे. कारण एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीला सोबत घेऊनही भाजपचं टेन्शन कमी झालेलं नाही.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात Shiv Sena-NCP बसणार झटका!
Mood of The Nation Maharashtra 2024 : 2019 नंतर महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलून गेलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळेल, असे म्हटले जात होते. मात्र, इंडिया टुडे-सी व्होटर सर्वे झोप उडवताना दिसत आहे. कारण एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीला सोबत घेऊनही भाजपचं टेन्शन कमी झालेलं नाही.
ADVERTISEMENT
इंडिया टुडे-सी व्होटरने देशातील 543 लोकसभा मतदारसंघात जाऊन हे सर्वेक्षण केले असून, 1,49092 सॅम्पल सर्वेक्षण करून निष्कर्ष काढण्यात आले आहेत. हे सर्वेक्षण 15 डिसेंबर ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत करण्यात आले असून, महाराष्ट्रातील कल महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत आहे.
महाविकास आघाडीला किती मिळणार जागा?
मूड ऑफ द नेशनच्या पोलनुसार, महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाली, तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होताना दिसत आहे. लोकसभा निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीला २६ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांना मिळून १४ जागा मिळू शकतात. तर काँग्रेस १२ जागा जिंकू शकते. म्हणजे महाविकास आघाडी राज्यात २६ जागा जिंकू शकते, असा अदांज मूड ऑफ द नेशन सर्वेमधून व्यक्त करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
महायुती आघाडीला फटका बसणार?
भाजपने महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. पण, महायुतीला झटका बसताना दिसत आहे. मूड ऑफ द नेशननुसार, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांना मिळून फक्त सहा जागा मिळू शकतात. त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदे-अजित पवारांना सोबत घेणं फायद्याचं ठरताना दिसत नाही.
महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला मोठा फटका बसताना दिसत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला आता निवडणूक झाल्यास केवळ १६ जागा मिळू शकतात. त्यामुळे महायुती महाराष्ट्रात २२ जागा जिंकू शकते, असा अंदाज या सर्वेक्षणाने व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडी विरुद्ध महायुती कुणाला किती मते?
आता कोणत्या आघाडीला किती टक्के मते मिळू शकतात, याबद्दल जाणून घेऊयात. आज निवडणूक झाल्यास महाविकास आघाडी मतांच्या बाबतीतही मुसंडी मारताना दिसत आहे. महाविकास आघाडीला एकूण मतांपैकी 45 टक्के मते मिळू शकतात, तर 40 टक्के मते 40 महायुतीला मिळू शकतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT