Suresh Dhas: "सर्व पुरावे या सतरा मोबाईलमध्ये..."; संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धसांचं खळबळजनक विधान!
Suresh Dhas On Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवनवीन ट्वीस्ट समोर येत आहेत. विरोधक महायुती सरकारचे मंत्री धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

"नितीन कुलकर्णी आणि वाल्किम आका हे दोघेजण मिळून..."

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
Suresh Dhas On Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवनवीन ट्वीस्ट समोर येत आहेत. विरोधक महायुती सरकारचे मंत्री धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देशमुखांच्या हत्याप्रकरणावरून पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. यावेळी पुण्यातील मोर्चात सुरेश धस यांनी आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "आमचे वाल्मिक अण्णा उर्फ आका सतरा मोबाईल नंबर वापरतात. बीडचे एसपी आणि सिआयडीच्या आयजी साहेबांना माझी विनंती आहे की, नितीन कुलकर्णी आणि वाल्किम आका हे दोघेजण मिळून सतरा मोबाईल वापरतात. हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे. माझी विनंती आहे, नितीन कुलकर्णीने कोणा कोणाकडून किती माल घेतलेला आहे. याचे सर्व पुरावे या सतरा मोबाईलमध्ये सापडतील. पुणे जिथे काहीच नाही उणे..."
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मिश्किल टीप्पणी करत धस म्हणाले, अजितदादा फार प्रांजळ मताचा माणूस आहे. पाच वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे. मी ज्यावेळी त्यांच्यासोबत होतो..काही लोकांना मी घेऊन गेलो होतो. तेव्हा म्हणालो यांच्याबाबतीत फोन करा. अजितदादा म्हणाले, हे चुकीचे वागणारे लोक आहेत. मी यांच्याबाबतीत फोन करणार नाही. एक दोन वेळा नाही दहावेळा माझ्याबाबतीत असं घडलं. मी राष्ट्रवादीत 2005 पासून 2015 पर्यंत राष्ट्रवादीत होतो. जवळपास दहा अकरा वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं. अजितदादा असा नव्हता रे...अजितदादा तुझं काय अडकलंय यांच्यापाशी..हे सातपुडा बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो. राजकारण सोडून देईल.
हे ही वाचा >> Jitendra Awhad: "हत्येच्या दोन महिने आधी दोन कोटींची खंडणी...", संतोष देशमुख हत्याप्रकरणी आव्हाडांनी उडवली खळबळ
आता माझ्याकडे तीनशे गाईंचा गोठा आहे. हजार गाईंचा गोठा करेन. मी राजकारणात राहणार नाही. पण दादा तुम्ही, एकनाथ राव शिंदे साहेब तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री ज्या माणसावर विश्वास आहे तुम्हाला, माझी विनंती आहे की याचा छडा लावा. ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केसचं हे होत नाही..तोपर्यंत बाहेर काढा ना..आमचं म्हणणं आहे सरकारच्या बाहेर ठेवा. राजीनामा घ्यायचा नसेल तर बिनखात्याचा मंत्री करा, असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.