"ज्यांची नावं चुकीच्या कामात सामील आहेत, त्यांना मी...", माणिकराव कोकाटेंबाबत CM फडणवीस काय म्हणाले?
CM Devendra Fadnavis Press Conference: "माणिकराव कोकोटे यांना हे माहिती नसेल, पीएस आणि ओसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात. मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात".
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

माणिकराव कोकोटेंबाबत CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

"कोणती ना कोणती चौकशी चाललेली आहे किंवा..."

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
CM Devendra Fadnavis Press Conference: "माणिकराव कोकोटे यांना हे माहिती नसेल, पीएस आणि ओसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात. मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात, हे काही नव्याने होत नाही. मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा. पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नाव चुकीच्या कामात सामील आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही. आतापर्यंत माझ्याकडे जवळपास 125 नावं आली. त्यातली 109 नावं मी क्लीअर केलेली आहेत. उर्वरित नाव मी क्लीअर केली नाहीत. कारण कोणता ना कोणता आरोप त्यांच्यावर आहे. कोणती ना कोणती चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयात त्यांच्यामध्ये फिक्सरचं परसेप्शन आहे. कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही", असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
"आमच्याकडे कोणीही तक्रार केली, तर त्या तक्रारीची चौकशी आम्ही करतो. तक्रार झाली म्हणजे अनियमितता झाली असं म्हणण्याचं कारण नाही. तक्रारीच्या अंती जे काही समोर येईल त्यावर मी फायनल कमेंट देईन", असंही फडणवीस म्हणाले. सोलार विजेच्या संदर्भात विद्युत नियामक मंडळाने एक प्रस्ताव पाठवलाय की, सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत जी वीज असेल ती ग्राहकांना वापरता येईल, इतर वेळी त्याचे चार्जेस लागतील, यावर बोलताना राज्याचे फडणवीस म्हणाले, "सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, घरगुती वीज ग्राहकांसाठी हा लागू नाही. पीएम सूर्यघरसाठीही लागू नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक काही लोक चुकीचं पसरवत आहेत.
हे ही वाचा >> Sushma Andhare: "दोन मर्सिडीज दिल्या असं म्हणत असतील, तर त्यांनी...", सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंवर हल्लाबोल
चुकीच्या गोष्टी सांगत आहेत. अशाप्रकारे कुठेही घरगुती सोलर धारक किंवा पीएम सूर्यघरवाले या निर्णयाने अफेक्ट होणार नाहीत. या इंड्रस्टीज त्या एक्सेस वीज जर वापरतील, तर त्यातून जो काही पैसा आहे तो राज्याच्या युटीलीटीला मिळायला पाहिजे. या दृष्टीने हे प्रपोजल तयार करण्यात आलेलं आहे. प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत. विशेषत: जे साहित्यिक आहेत, या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशाप्रकारचं त्याचं नेहमी वक्तव्य असतं. मग त्यांनीदेखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत, ते करणं योग्य नाहीय. त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे, असं माझं मत आहे, असंही फडणवीस म्हणाले.