CM Devendra Fadnavis : "...म्हणून सर्वात जास्त मराठा आमदार भाजपमधून झाले", फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Exclusive

point

जातीय समीकरणांबद्दल फडणवीसांची रोखठोक भूमिका

point

मराठा मतांबद्दल काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadnavis Exclusive Interview : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वी या नव्या सरकराचा शपथविधीही पार पडला. यंदा देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात  ख्यमंत्रि‍पदाची माळ पडली असून, त्याच निमित्तानं त्यांच्याशी आज तक आणि मुंबई तकने संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातल्या जातीय समीकरणांबद्दल फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. तसंच जात ही फक्त नेत्यांच्या मनात असून जनता काम पाहते असं त्यांनी सांगितलं. माझ्यावर इतर कुठलेच आरोप न होऊ शकल्यानं राज्यात विरोधकांकडून जातीचं राजकारण सुरू करण्यात आलं असंही ते म्हणाले. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>'सदा सरवणकरांचा माज उतरवायचा होता, तो माज आज उतरवला', ठाकरेंच्या आमदाराची थेट टीका

मराठा समुहाचं वर्चस्व असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रि‍पदाची जबाबदारी देण्यात आली. याबद्दलचा सवाल करण्यात आला असता, देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली.  "जात जी आहे ती फक्त नेत्यांच्या मनात आहे, जनतेच्या मनात नाही. जनता काम बघते. नेते फक्त जातीच्या माध्यमातून राजकारण करतात. मात्र, मोदींनी गुजरातपासून सर्व ठिकाणी लोकांचं ऐकलंय. महाराष्ट्रात आज आम्हाला 132 जागा मिळाल्या. मराठा आणि ओबीसी दोघांनीही मत दिल्यामुळे आम्हाला एवढे आमदार मिळाले. लोक म्हणतात आम्हाला लोकसभेला मराठ्यांनी मतदान केलं नाही. 43.9 टक्के मतं महाविकास आघाडीला मिळालं, तर 43.6 टक्के मतं आम्हाला मिळाले. फक्त 0.3 टक्क्यांचा फरक होता" असं फडणवीस म्हणाले. 


हे ही वाचा >>Devendra Fadnavis : 'जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?' पवारांच्या प्रश्नाला CM फडणवीसांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, आज सर्वात जास्त मराठा आमदार भाजपमधून निवडून आले आहेत, मराठा सोबत नसते तर एवढे मतं मिळालेच नसते. जातीचं राजकारण तेव्हा सुरू होतं, जेव्हा इतर कुठलाही मुद्दा काम करत नाही. मागच्या पाच वर्षात माझ्यावर कुठलाही आरोप झाला नव्हता, म्हणून मग जातीचं राजकारण सुरू झालं. पण ते अयशस्वी झाले. राज्याला माझी जात माहिती आहे, मला महाराष्ट्राने स्वीकारलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT