ladki Bahin Yojana : महिलांनो! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे; CM शिंदेंनी दिली अपडेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana 4500 amount deposite women these account know the full details
तुमचे 4500 रूपये नेमके कोणत्या खात्यात येणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आली समोर

point

महिलांच्या खात्यात "या' दिवशी जमा होईल ऑक्टोबर-नोव्हेंबरची रक्कम?

point

लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच म्हटलंय की, निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरसाठी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आगाऊ रक्कम दिली जात आहे. आचार संहिता लागू झाल्यानंतर विरोधी पक्ष लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मासिक हफ्त्यात अडचणी निर्माण करू शकतात. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्याच होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26  नोव्हेंबरला संपणार आहे. (CM Eknath Shinde, has recently said that keeping in mind the code of conduct of the elections, advance money is being given to the women beneficiaries of the Ladki Bahin Yojana for October and November)

महिलांना दरमहा दिले जातात 1500 रुपये

एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरच्या एका रॅलीत म्हटलं की, 'विरोधी पक्षांच्या हालचाली ओळखून राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे'. ज्याचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. राज्यात सुरु केलेल्या योजनांवर सामान्यपणे आचारसंहितेचा प्रभाव पडत नाही. परंतु, शिंदे सरकारला कोणताही धोका पत्करायचा नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.

हे ही वाचा >>  Horoscope In Marathi : नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पैशांचा पडणार पाऊस? 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंती

राज्यात जवळपास 2 कोटी महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाल्याचे सरकारकडून सांगितलं जात आहे. या योजनेतील अनेक पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 तर काही महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा करण्यात आले आहेत. परंतु, लाडकी बहीण योजनेचा चौथा हफ्ता कोणत्या तारखेला मिळणार? असा प्रश्न महिलांना पडला होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी 8 ऑक्टोबरपासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात चौथ्या हफ्त्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांची एकत्रित रक्कम जमा होईल.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : 2 कोटी महिलांच्या खात्यात 3000 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT