Raosaheb Danve : 'दानवे कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मुडदे पाडलेत', खोतकरांना इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

   raosaheb danve criticize arjun khotkar abdul sattar jalana constituency assembly maharashtra assembly election 2024
जालन्यात आज भाजपा सदस्यता अभियान व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काही महाभाग म्हणताय रावसाहेब दानवे माझ्यामुळे हारले

point

रावसाहेब दानवे कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही

point

चांगल्या चांगल्यांचे मुडदे पाडलेत

Raosaheb Danve On Arjun khotkar : गौरव साळी, जालना : जिंकल्याचं क्रेडिट घ्यायची पद्धत आहे. पण काही महाभाग म्हणताय रावसाहेब दानवे माझ्यामुळे हारले, त्यांचा सत्कार केला पाहिजे, असा सणसणीत टोला भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना लगावला आहे. तसेच रावसाहेब दानवे कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मुडदे पाडलेत, असा इशारा देखील त्यांनी खोतकरांना दिला आहे. (raosaheb danve criticize arjun khotkar abdul sattar jalana constituency assembly maharashtra assembly election 2024) 

जालन्यात आज भाजपा सदस्यता अभियान व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करताना दानवे बोलत होते. भाजपा आणि मित्र पक्ष या राज्यात एकत्र लढून पुन्हा सत्ता आणू असं म्हणत ही निवडणूक भाजपने विकासाच्या मुद्द्यावर लढवण्याचे ठरवले असल्याचं दानवे म्हणालेत.  जालना आणि घनसावंगी या दोन जागा भाजपाला सोडण्यासाठी मी पक्ष श्रेष्ठीकडे प्रयत्न करणार असं देखील दानवे म्हणालेत. फक्त भोकरदन, बदनापूर आणि परतूर नाही, तर जालना आणि घनसावंगी मध्ये सुद्धा भाजपाची ताकद असल्याचं दानवे यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दसरा, दिवाळी झाली गोड! 4500 नंतर 3 हजार खात्यात जमा, तुमचे आले का?

जागावाटपावर देखील दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. जागा वाटप लहान भाऊ - मोठा भाऊ म्हणून होत नसतं, ज्याची ताकद जिथे त्या ठिकाणची जागा त्याला अशा प्रकारचं जागा वाटपाच सूत्र असल्याचं दानवे म्हणालेत. महायुतीत जागा वाटपाचा तिढा नसल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलंय. मी राज्यपातळीवरचा नेता आहे, मी गल्लीतला नेता नाही असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्या इशाऱ्यावर बोलणं टाळलंय. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अब्दुल सत्तारांवर टीका 

बायका आमच्या आहेत, आणि साड्या त्याच्या, कोण स्वाभिमानी माणूस त्याची साडी घेईल अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी वांगी बुद्रुक येथे महिलांनी अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या साड्यांची होळी केल्याच्या घटनेवर दिली आहे. एवढ्या वर्षात कधी साड्या वाटल्या नाही, आणि आता कश्या वाटताय असा सवाल करत कपडे वाटून लालुच दाखवणं चालू आहे का असा प्रश्न दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना केलाय. विकास करा, आणि विकासावर मत घ्या असं सांगत एखाद्या माणसाला बोलण्याची, बसण्याची, वागण्याची आचारसंहिता कळत नसेल तर त्याला काय बोलू शकतो असा म्हणत रावसाहेब दानवे यांनी सत्तार पिता पुत्रांवर नाराजी व्यक्त केली.

हे ही वाचा : Rahul Gandhi : 'वांग्याची भाजी बनवली, भाकल्या थापल्या', टेम्पोचालकाच्या घरी राहुल गांधींनी काय काय केलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT