"धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी..."; रामगिरी महाराजांची भेट घेतल्यानंतर CM शिंदे नेमकं काय म्हणाले?
CM Eknath Shinde Latest News : संत सहवास आणि हरिनामाचा जप करत सर्व समस्या मिटतात. जगण्याची कोंडी सुटते आणि अनेक प्रश्न उलगडतात. म्हणून मनाला उभारी आणि जगण्याची दिशा मिळाल्याची भावना अशाप्रकारच्या अखंड हरिनाम सप्ताहात मिळत असते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
"पांडूरंगाचा वारकरी म्हणून माझी जबाबदारी"
रामगिरी महाराजांबाबत CM शिंदेंचं मोठं विधान
आनंद दिघेंच्या आठवणींनाही शिंदेंनी दिला उजाळा
CM Eknath Shinde Latest News : संत सहवास आणि हरिनामाचा जप करत सर्व समस्या मिटतात. जगण्याची कोंडी सुटते आणि अनेक प्रश्न उलगडतात. म्हणून मनाला उभारी आणि जगण्याची दिशा मिळाल्याची भावना अशाप्रकारच्या अखंड हरिनाम सप्ताहात मिळत असते. म्हणूनच मी स्वत:ला भाग्यवान समजतो. आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब अखंड हरिनाम सप्ताह चुकवत नव्हते. आम्ही त्यांच्यासोबत जायचो. ते म्हणायचे, माणसाच्या आयुष्यात धावपळच असते. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून थोडा का होईना माणूस पांडुरंगाच्या भक्तीत विलिन होऊन जातो, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये रामगिरी महाराजांची भेट घेतल्यानंतर शिंदेंनी जनतेला संबोधीत केलं.
ADVERTISEMENT
"पांडूरंगाचा वारकरी म्हणून माझी जबाबदारी"
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो. आजी, माझे आई-वडिल मला पंढरपूरला घेऊन गेले होते. म्हणून मनाला उभारी आणि जगण्याला दिशा मिळाल्याची भावना अशाप्रकारच्या अखंड हरिनाम सप्ताहमधून मिळत असते. शेतकरी कुटुंबातला एक मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो. आषाढीच्या आठ दिवस आधी मी गेलो, तिथली सर्व व्यवस्था पाहिली. कारण पांडुरंगाच्या वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, त्यांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात. तिथे स्वच्छता असावी, पिण्याचं पाणी असावं, हे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर पांडुरंगाचा वारकरी म्हणून माझी जबाबदारी आहे.
हे ही वाचा >> Sharad Pawar: "महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल, तर..."; मविआच्या मेळाव्यात शरद पवारांचं सूचक विधान
रामगिरी महाराजांबाबत CM शिंदेंचं मोठं विधान
नाशिकच्या पुण्यभूमीत अखंड हरिनामाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरवर्षी लाखो भाविक इथे येतात. अखंड हरिनाम सप्ताहासाठी लोक इथे येतात, हे दिव्य आणि आगळंवेगळं आहे. यावर्षी आषाढीला गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट लोक होते. गेल्यावर्षी १५ लाख होते. यावर्षी २५ लाख वारकरी होते. ही ताकद वारकरी संप्रदायाची आहे. महाराष्ट्रात किर्तनाच्या आणि प्रवचनाच्या माध्यमातून गावागावात आणि तालुका तालुक्यात समाज प्रबोधनाचं काम करत असतात.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अनेक लोकांची कुटुंबं दुख:तून सावरलेली आपण पाहतो. यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात.या जागेवर देवाचा वास आहे. देवाचा आशीर्वाद आहे. पांडूरंगाचा आशीर्वाद आहे. इथे भक्तीचा भाव आहे आणि अखंड वातावरणात प्रसन्नता आहे. उन्हाची, पावसाची चिंता न करता अशाप्रकारच्या संतांच्या किर्तनाला लोक हजर राहतात.
हे ही वाचा >> Sanjay Raut: महाराष्ट्राची लाडकी बहीण कोण? संजय राऊतांनी मविआच्या मेळाव्यात थेट नावच सांगितलं
ADVERTISEMENT