CM Eknath Shinde : राज ठाकरेंना मी विचारलंही होतं, पण त्यांनी थेट... संवाद तुटला? दादर-माहिमचा मुद्दा तापला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे- राज ठाकरेंचा संवाद तुटला?

point

दादर-माहिम मतादारसंघाचा मुद्दा तापला?

point

वाचा एकनाथ शिंदेंनी सांगितलेला शब्द अन् शब्द

CM Eknath Shinde on Dadar Mahim Vidhan Sabha : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. या सर्वांमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे दाद- माहिम मतदारसंघ. या मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. तर याच मतदारसंघातून एकनाथ शिंदेंचे शिलेदार सदा सरवणकर हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे महायुतीच्या जवळ असलेल्या राज ठाकरेंच्या मुलासाठी राजकीय तडजोडी होतील का यावर सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली आणि आमचा उमेदवार तिथून लढणारच असं स्पष्ट केलं आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंनी राज ठाकरेंसोबत काय संवाद झाला होता, हे सुद्धा सांगितलं.

ADVERTISEMENT

 

शिंदेंनी सांगितलेला शब्द अन् शब्द जसाच्या तसा...

 

हे ही वाचा >>Amit Thackeray : शिवाजी पार्क दीपोत्सव प्रकरणी चौकशी सुरू, ठाकरेंच्या शिवसेनेच्या तक्रारीची दखल, अमित ठाकरेंची उमेदवारी...

 

"लोकसभेला राज ठाकरे आमच्यासोबत होते, माझी आणि त्यांची चर्चाही झाली होती, तुमची काय रणनीती आहे असं मी त्यांना विचारलंही होतं, तेव्हा ते म्हणाले होते की, तुमचं शिवसेना-राष्ट्रवादी-भाजपचा निर्णय होऊ द्या, पण त्यांनी नंतर थेट उमेदवार उभे केले" असं शिंदेंनी दादर माहिम मतदारसंघाबद्दल बोलताना सांगितलं. दादर माहिमध्ये उभे असलेले आमचे उमेदवार हे तिथले दोन वेळा आमदार राहिले आहेत, ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. मी त्यांच्यासोबतही बोललो, पण त्यांचे समर्थक खूप आक्रमक झाले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल तुटू नये याची काळजी एक नेता म्हणून मी घेतोय असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. त्यामुळे आम्ही महायुती म्हणून तिथून निवडणूक लढणार असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सदा सरवणकर यांना माघार घ्यायला सांगून शिंदे अमित ठाकरे यांना मदत करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. तर मागच्या काही दिवसातल्या राज ठाकरे आणि महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी पाहता विधानसभेला मनसे महायुतीसोबत असेल, किंवा काही जागांवर महायुती मनसेला मदत करेल अशी शक्यता होती. मात्र दोन्हीही गोष्टी घडल्या नाहीत. शिंदेंनी आपला शिलेदार म्हणून सदा सरवणकर यांना यंदाही उमेदवारी दिली. त्यानंतर सरवणकर यांच्या राजकीय दबाव असल्याचीही चर्चा सुरू होती. त्यातच आता एकनाथ शिंदेंनीही सदा सरवणकर हे लढणार असं सांगून त्यांना ताकद दिली आहे.

हे ही वाचा >>CM Eknath Shinde : ...तर बाळासाहेबांनी थोबाड फोडलं असतं, अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे संतापले आणि थेट...


उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले शिंदे?
राज्यात तयार झालेलं मविआचं सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात होतं. आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समजवण्याचा प्रयत्नही केला होता, मात्र मुख्यमंत्रीपदाच्या मोहामुळे काँग्रेससोबत सरकार बनवलं असं शिंदे यांनी सांगितलं. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT