Maharashtra Budget: 'महाराष्ट्र भवन'बाबत अजित पवारांची मोठी घोषणा
Maharashtra Bhavan: श्रीनगर आणि अयोध्या या दोन ठिकाणी राज्य सरकार महाराष्ट्र भवन उभारणार आहे. त्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. त्याच्या जागांसाठी 77 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दोन राज्यात महाराष्ट्र भवन उभारणार
अजित पवारांनी विधानसभेत केली घोषणा
अयोध्या-श्रीनगरमध्ये उभं राहणार महाराष्ट्र भवन
Maharashtra Bhavan Srinagar Ayodhya: मुंबई: लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तसेच राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अवघे काही महिनेच शिल्लक आहेत. त्यानिमित्ताने अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशात आज (27 फेब्रुवारी) राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला. यावेळी अजित पवार यांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. (dcm ajit pawar big announcement regarding maharashtra bhavan will be constructed by state government at two places in srinagar and ayodhya)
ADVERTISEMENT
'या' दोन राज्यात उभारणार महाराष्ट्र भवन
अंतरिम अर्थसंकल्प असल्याने अजित पवार यांनी छोटेखानी स्वरुपाचं भाषण करत अर्थसंकल्प सादर केला. मात्र, यामध्ये त्यांनी दोन राज्यात महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा केली आहे.
'राज्यातील पर्यटकांना आणि भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सुविधा पुरविण्यासाठी श्रीनगर, जम्मू-काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे.'
'या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने अतिशय मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेतलेल्या आहेत. या जागांसाठी 77 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.' अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणत पर्यटक हे जम्मू-काश्मीरला जात असतात. अशावेळी त्यांना अधिकचे पैसे खर्च करून तेथील हॉटेल्समध्ये राहावं लागतं. मात्र, आता राज्य सरकार स्वत: काश्मीरमधील श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा महाराष्ट्रातील पर्यटकांना होणार आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> जरांगेंच्या भाषेचं समर्थन मी करणार नाही, पण आंदोलन का चिघळलं?
दुसरीकडे नुकतंच उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्ये भव्य राम मंदिराची उभारणी करण्यात आली. ज्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. ज्यानंतर संपूर्ण देशभरातून आता रामभक्तांचा ओघ हा अयोध्याच्या दिशेने सुरू झाला आहे. तसेच महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात भाविक हे अयोध्याला जात आहे.
अशावेळी अयोध्येत देखील महाराष्ट्र भवन उभारण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळेच श्रीनगर आणि अयोध्येत महाराष्ट्र भवनाची उभारणी करण्यासाठी हालचाल सुरू केली असून दोन्ही महाराष्ट्र भवनाच्या जागांसाठी 77 कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे.
ADVERTISEMENT
अंतरिम अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे:
- नागपूरच्या धर्तीवर पुण्यातील औंध येथे एम्स रुग्णालय स्थापन करण्याचे नियोजन.
-महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतंर्गत वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब १ लाख ५० हजारावरून ५ लाख करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
-गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू करण्यात येत आहे.
- संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थ्यांना अर्थसहाय्य १ हजारावरून १ हजार ५०० रुपयांची वाढ.
- संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या भागभांडवलाच्या अनुदानात वाढ.
हे ही वाचा>> जरांगेंची एसआयटी चौकशी करणार; फडणवीसांची विधानसभेत घोषणा
- पायाभूत सुविधांबरोबरच लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे.
- २२ पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यासाठी महामंडळ स्थापन करण्यात आली आहे.
- अहमदनगर बीड परळी वैजनाथ, वर्धा यवतमाळ नांदेड, देसाईगंज गडचिरोली, नागपूर नागभीड रेल्वे प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर
- कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक, सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गांसाठी भूसंपादनाचे काम सुरू
- फलटण-पंढरपूर, तापा चिमूर वरोरा, जळगाव-जालना, नांदेड बिदर या रेल्वे मार्गांसाठी प्रकल्प किंमतीच्या ५० टक्के आर्थिक सहभाग देण्यास राज्य सरकारची मान्यता.
- जालना-खामगाव, आदिलाबाद माहूर वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर यवतमाळ शंकुतला रेल्वे आणि पुणे-लोणावळ मार्गिका तीन व चार या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्याचा ५० टक्के सहभाग.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT