Devendra Fadnavis Security : गुप्तचर यंत्रणांकडून अलर्टनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ, नेमकं कारण काय?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ

point

फडणवीसांच्या सुरक्षेत आता फोर्स वनचे 12 जवान

point

सागर बंगल्याभोवती फोर्स वनचे जवान तैनात

Devendra Fadnavis Security मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत 'फोर्स वन'ची तैनाती ही केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती 'मुंबई तक'ला प्राप्त झाली आहे.

 

हे  ही वाचा >>Amit Thackeray : शिवाजी पार्क दीपोत्सव प्रकरणी चौकशी सुरू, ठाकरेंच्या शिवसेनेच्या तक्रारीची दखल, अमित ठाकरेंची उमेदवारी...

 

मुंबई पोलिसांचे विशेष पथक असलेले 'फोर्स वन'चे 12 जवान हे देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत त्यामुळेच तैनात करण्यात आले असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी एकापाठोपाठ एक 2 वेळा राज्य पोलिस दलाला अलर्ट पाठविले. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडे जी माहिती येते, त्यातून काही संभाषणातून 'अल्ट्रा फोर्सेस'कडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका आहे आणि तसा कट आखण्यात आल्याची नेमकी माहिती प्राप्त झाली. ती लगोलग राज्य पोलिस दलाला केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली. त्यामुळे राज्याचे पोलिस दल सतर्क झाले आणि त्यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेचा संपूर्ण आढावा घेतला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Mumbai Andheri Fire : मुंबईतील अंधेरीत लाकडाच्या गोदामाला मोठी आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

 

या आढाव्यानंतर लगेचच नियमित झेड प्लस सुरक्षा यंत्रणेला सतर्क करण्यात आले आणि 'फोर्स वन'च्या जवानांना सुद्धा या सुरक्षेत तैनात करण्यात आले. त्यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान, नागपूर येथील निवासस्थान तसेच त्यांच्या कार्यक्रमात ही सुरक्षा देण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात होत असलेली विधानसभा निवडणूक आणि त्यातून मोठ्या प्रमाणात जनतेत वावर यामुळे अधिकची खबरदारी घेण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहेत. काल अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी लागलेला बंदोबस्त पाहून देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला होता. मात्र, त्यांनी याची माहिती पोलिसांकडून घ्या, असे मोघम उत्तर दिले होते. याबाबत गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही माहिती किंवा तपशील देण्यास नकार दिला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT