BJP Ministers: 'ही' आहे भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, फडणवीस मुख्यमंत्री हे ठरलं, पण मंत्री कोण-कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपमधून कोणा-कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

point

देवेंद्र फडणवीस आपल्या टीममध्ये कोणाला घेणार?

point

पाहा भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावं

BJP: मुंबई: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्या (5 डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानावर शपथ घेणार आहेत. ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. पण आता त्यांच्यासोबत भाजपचे कोणते मंत्री शपथ घेऊ शकतात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (devendra fadnavis will become the chief minister but who will get the ministerial post see the list of probable bjp ministers)

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस हे 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. त्याचवेळी त्यांनी स्वत:ची अशी एक टीम तयार केली. ज्यामध्ये अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी दिली होती. 2022 साली पुन्हा एकदा भाजप-महायुतीचं सरकार आलं तेव्हा देखील फडणवीसांनी आपल्या काही महत्त्वाच्या नेत्यांना मंत्रिपद देऊ केलं.

हे ही वाचा>> Ajit Pawar Vs Eknath Shinde : 'मी तर शपथ घेणार, त्यांचं काही...' अजितदादांचा टोला, शिंदे म्हणाले; 'दादांना सकाळी-संध्याकाळ...'

अशावेळी आता देवेंद्र फडणवीस हे जेव्हा पूर्ण ताकदीने मुख्यमंत्री म्हणून पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता ते कोणाला मंत्रिपद देणार याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान, भाजपचे संभाव्य मंत्री नेमकं कोण-कोण असू शकतात यावर टाकूया एक नजर...

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाची यादी 

  1. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
  2. राधाकृष्ण विखे-पाटील
  3. सुधीर मुनगंटीवार
  4. चंद्रकांत पाटील
  5. गिरीश महाजन
  6. सुरेश खाडे
  7. रवींद्र चव्हाण
  8. अतुल सावे
  9. मंगलप्रभात लोढा
  10. जयकुमार रावळ
  11. चंद्रशेखर बावनकुळे
  12. बबनराव लोणीकर
  13. पंकजा मुंडे
  14. अतुल सावे
  15. देवयानी फरांदे
  16. किसन कथोरे
  17. नितेश राणे
  18. आशिष शेलार
  19. राहुल नार्वेकर
  20. संभाजी निलंगेकर
  21. राहुल कुल

हे ही वाचा>> मोठी बातमी! फडणवीस भेटले पण शिंदे 'अजूनही' अडून बसले, आता थेट शाहांना...

या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. पण असं असलं तरी भाजप हे कायमच धक्कातंत्र देतं अशावेळी काही आश्चर्यचकीत करणारी नावं देखील या यादीमध्ये असण्याची शक्यता आहे. तसेच काही अपेक्षित असणारी नावं ही डावलली जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. 

ADVERTISEMENT

त्यामुळे भाजप आपल्या पक्षातील कोणत्या नेत्यांना मंत्रिपद देतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT