'धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही, ह%#$@ औलादीचं...', जरांगे आक्रमक
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी परभणीतील मोर्चामध्ये मनोज जरांगे यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत त्यांना इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT

परभणी: संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आज (4 जानेवारी) परभणीत सर्वपक्षीय मोर्चा घेण्यात आला. ज्यामध्ये बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आक्रमक झालेले दिसून आले. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच थेट मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत त्यांना इशारा दिला आहे. (if santosh deshmukh family is disturbed even a little dhananjay munde will not be allowed to roam streets anymore manoj jarange has warned)
'जर संतोष देशमुख यांच्या कुटुबीयांना जरा जरी धक्का लागला तर यापुढे धनंजय मुंडेला रस्त्याने फिरू देणार नाही.' असं जरांगे यावेळी म्हणाले.
धनंजय मुंडेंना इशारा, पाहा जरांगे परभणीत काय म्हणाले...
'मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही. कारण माझा स्वभाव आहे की, मला काही तरी कुणकुण लागल्याशिवाय कोणाच्या वाटेला जात नाही. आमचे संतोष भैय्या तर गेलेच.. पण यापुढे त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही.'
'आमचा एक भाऊ गेला तो आम्ही सहन केला. त्या मुंड्याचं-फिंड्याचं नाव सुद्धा घेतलं नाही आम्ही ह%#$@ औलादीचं.. पण जर देशमुख कुटुंबीयांना यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही.'
हे ही वाचा>> 'संतोष देशमुखांचा खून आरोपींनी एन्जॉय केला', सुदर्शन घुले कोर्टात.. नेमकं काय घडलं?
'परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो किंवा बीड जिल्हा असो.. इथल्या आपल्या समाजाला त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव.. यांना घराघरात घुसून हाणायचं.'
'जर इथून पुढे यांनी आता लोकांना त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव.. एकदा यांना बघायचंच. घे बघा मी असं कधी बोलत नाही. पण व्यासपीठावर एवढे जमले आहेत सगळ्या पक्षाचे आमदार-खासदार.. ज्यावेळेस अस्मितेचा विषय येतो जर माणसांचे मुडदेच पडायला लागले तर हे सहन होत नाही.'
'आम्हाला माज नाही, आम्हाला मस्ती पण नाही. जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावर पाडायला लागला.. आज काय दशा आहे त्या कुटुंबाची? कसं जगायचं त्या पोरीनं अन् पोरानं?'
हे ही वाचा>> Suresh Dhas Parbhani : अजितदादा क्या हुआ ते वादा? बीडमधील परिस्थिती सांगत सुरेश धस यांचा तुफान हल्लाबोल
'तुम्ही जर आमचे लोकं मारून तुमचे आरोपी जर घरात लपवून ठेवतात.. यांना पुण्यात नेमकं सांभाळलं कोणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? सगळेचे सगळे आरोपी हे पुण्यातच सापडतात. याचा अर्थ तुमच्या सरकारमधील मंत्रीच आरोपींना सांभाळायला लागले आहेत.'
'या खंडणीमधील आरोपींना आणि हत्येतील आरोपींची नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्यांना सांभाळणऱ्यांना सहआरोपी केलं पाहिजे.'
'सरकारचं आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का चार्जशीट कच्चं झालं आणि त्यातील एकही आरोपी बाहेर आला की, मंत्री गोट्याने हाणलाच...'
'आता तुम्हाला हीच भाषा कळते. आम्ही करतो तो जातीवाद म्हणता. संतोष देशमुखांना न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवं षडयंत्र सुरू झालं आहे.' असं जरांगे यावेळी म्हणाले.